agriculture news in marathi preparation of Ice cream, rabadi, basundi from custard apple | Page 2 ||| Agrowon

सीताफळापासून बनवा आइस्क्रीम, रबडी, बासुंदी

गणेश गायकवाड, ऋषिकेश माने
शनिवार, 10 ऑक्टोबर 2020

सीताफळाचा गर वेगळा काढून केलेले पदार्थ आवडीने खाल्ले जातात. सीताफळापासून आइस्क्रीम, रबडी, श्रीखंड, बासुंदी मिल्कशेक असे विविध पदार्थ केले जातात.
 

सीताफळाचा गर वेगळा काढून केलेले पदार्थ आवडीने खाल्ले जातात. सीताफळापासून आइस्क्रीम, रबडी, श्रीखंड, बासुंदी मिल्कशेक असे विविध पदार्थ केले जातात.

महाराष्ट्रामध्ये सीताफळाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. विशिष्ट चव आणि गोडीमुळे बाजारपेठेत याला विशेष मागणी असते. सीताफळाचा गर वेगळा काढून केलेले पदार्थ आवडीने खाल्ले जातात. सीताफळापासून आइस्क्रीम, रबडी, श्रीखंड, बासुंदी मिल्कशेक असे विविध पदार्थ केले जातात.

सीताफळाचे मूल्यवर्धन 
आइस्क्रीम 
साहित्य 

सीताफळ गर १५० ग्रॅम, साखर १५० ग्रॅम, दूध २५० मिलि, क्रिम ५० ग्रॅम, दूध पावडर, आवडीनुसार सुगंधित द्रव्ये.

कृती 
प्रथम वरील सर्व सामग्री मिक्सरमधून एकत्रित करून घ्यावी. त्यामध्ये सीताफळाचा गर घालून मिश्रण चांगल्या प्रकारे ढवळून घ्यावे. मिश्रण घट्ट होण्यासाठी ८ ते १० तास फ्रिजमध्ये ठेवावे. तयार आइस्क्रीम चवीला उत्तम लागते. आइस्क्रीम बनवण्यासाठी चांगल्या प्रतीच्या अधिक स्निग्धांश असलेल्या म्हशीच्या दुधाचा वापर करावा.

रबडी 
साहित्य 

सीताफळ गर १५०-२०० ग्रॅम, म्हशीचे दूध १ लिटर, साखर १५० ग्रॅम, आवडीनुसार सुगंधित द्रव्ये.

कृती 
मंद आचेवर १ लिटर दूध अर्धे होईपर्यंत चांगले उकळून घ्यावे. दूध थंड करून त्यामध्ये सीताफळाचा गर, साखर आणि सुगंधित द्रव्ये घालून चांगले एकत्रित करून घ्यावे. तयार मिश्रणावर आवडीनुसार बारीक केलेले काजू, बदाम टाकावेत. मिश्रण थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यावे. रबडीमध्ये साखरेचा वापर कमी करावा, जेणेकरून सीताफळाची नैसर्गिक चव जाणार नाही.

श्रीखंड 
साहित्य 

सीताफळ गर १००-१५० ग्रॅम, चन्ना ४००-५०० ग्रॅम, साखर २००-३०० ग्रॅम, आवडीनुसार इलायची पावडर, काजू, बदाम, पिस्ता.

कृती 
प्रथम सीताफळ गर, चन्ना आणि साखर चांगले एकत्रित करून घ्यावे. तयार मिश्रण घट्ट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यावे. तयार श्रीखंडामध्ये आवडीनुसार इलायची पावडर, काजू, बदाम, पिस्ता इत्यादी टाकावेत.

बासुंदी 
साहित्य

सीताफळ गर ५०-१०० ग्रॅम, म्हशीचे दूध १ लिटर, क्रीम किंवा कंडेन्स्ड दूध २०० ग्रॅम, आवडीनुसार इलायची पावडर, काजू, बदाम, पिस्ता.

कृती 
मंद आचेवर १ लिटर दूध अर्धे होईपर्यंत उकळून घ्यावे. त्यामध्ये आवडीनुसार क्रीम किंवा कंडेन्स्ड दूध टाकून चांगले एकत्रित करावे. तयार मिश्रण मंद आचेवर ५ ते १० मिनिटे तापवून घ्यावे. तयार बासुंदी स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात काढावी. त्यावर इलायची पावडर, काजू, बदाम, पिस्ता टाकून फ्रीजमध्ये थंड होण्यास ठेवून द्यावे.

मिल्कशेक 
साहित्य 

सीताफळ गर १०० ग्रॅम, दूध अर्धा लिटर, क्रीम ५० ग्रॅम, व्हॅनिला आइस्क्रीम १०० ग्रॅम, दूध पावडर ५० ग्रॅम आणि साखर १०० ग्रॅम.

कृती 
प्रथम अर्ध्या लिटर दुधामध्ये क्रीम, व्हॅनिला आइस्क्रीम, सीताफळ गर, दूध पावडर आणि साखर टाकून घ्यावी. मिश्रण चांगले एकत्रित करावे. तयार मिश्रण थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यावे.

संपर्क - गणेश गायकवाड, ९८५०२३६३८०
(आचार्य पदवी विद्यार्थी, अन्न अभियांत्रिकी विभाग, अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.


इतर कृषी प्रक्रिया
आवळा प्रक्रिया उद्योगातील संधीआवळा फळांमध्ये असणारे औषधी गुणधर्म व भरपूर...
गुलाबापासून गुलकंद, जॅम,जेलीगुलाबाच्या पाकळ्यापासून गुलकंद, जॅम, जेली इत्यादी...
फळे, भाजीपाल्याचे पूर्व शीतकरणपूर्व-शीतकरणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पीक...
मसाल्यातील भेसळ ओळखण्याच्या पद्धती बाजारामध्ये उपलब्ध असलेल्‍या अनेक मसाल्यांमध्ये...
संत्र्याचे काढणीपश्‍चात तंत्रज्ञानसंत्रावर्गीय फळांचा आकर्षक रंग,स्वाद, चव टिकून...
ऑलिव्ह तेलापासून बनवले वनस्पतिजन्य मांसप्राणीज मांसाचा वापर केलेल्या अनेक पदार्थातून...
सोयाबीनचे मूल्यवर्धित पदार्थसोयाबीनपासून सोया-दूध, सोया पनीर, पीठ आणि...
उद्योजकतेमध्ये कुटुंब, समाजाचा हिस्साउद्योग म्हणजे जोखीम. त्याच्याच यश व अपयश या दोन...
बटाट्यापासून वेफर्स, पावडर, फ्रेंच...मानवी आहारामध्ये बटाट्याचा वापर मोठ्या प्रमाणावर...
सब्जा बियांचे आरोग्यदायी फायदे सब्जामध्ये प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने...
लघु उद्योग आजारी का पडतात?लघुउद्योगांना दीर्घकाळ नफ्यात चालण्यासाठी अनेक...
भाजीपाल्यावरील प्राथमिक प्रक्रियासौर ऊर्जेवरील ड्रायर, इलेक्ट्रिक ड्रायरच्या...
बीटपासून बनवा पराठा, पावडर, सूपबीट ही भाजी तशी फार लोकांना आवडत नाही. मात्र,...
ग्रामीण सेवा क्षेत्रातील उद्योगांचा...ग्रामीण भागामध्ये सेवा उद्योगाच्या विस्ताराला...
सीताफळापासून बनवा आइस्क्रीम, रबडी,...सीताफळाचा गर वेगळा काढून केलेले पदार्थ आवडीने...
बहुगुणी आवळ्याचे मूल्यवर्धित पदार्थआवळा हे तुरट व आंबट चवीचे हिवाळ्यात येणारे...
उत्पादन क्षेत्रातील ग्रामीण उद्योगांचे...ग्रामीण भागातील निर्मिती करणाऱ्या एका छोट्या...
छोट्या उपायांद्वारे टाळता येईल अन्न...मागील भागामध्ये कृषी उत्पादनाच्या व वाहतुकीच्या...
लघुउद्योग चालू करण्यापूर्वीची तयारीमागील दोन लेखांमध्ये आपण छोट्या उद्योगात नफ्याचे...
तंत्रज्ञान वापरातून टाळा अन्नाची नासाडीकार्लो पेट्रिनी यांच्या मते, प्रत्येकासाठी अन्न...