पणन मंडळ तयार करणार पीकनिहाय ‘थिंक टॅंक’

पणन मंडळ तयार करणार पीकनिहाय ‘थिंक टॅंक’
पणन मंडळ तयार करणार पीकनिहाय ‘थिंक टॅंक’

पुणे ः हवामान बदलांमुळे शेती उत्पादनावर होणाऱ्या विपरीत परिणामांमुळे भविष्यातील विविध पिकांच्या समस्या, उत्पादन, विपणन, बाजारभाव, प्रक्रिया, निर्यात, देशांतर्गत बाजारपेठ, मूल्यसाखळी आदी विविध मुद्यांवर विविध पिकांसाठी विचार आणि सल्ला गट (थिंक टॅंक) स्थापन करण्याचा निर्णय पणन मंडळाने घेतला आहे. यानुसार लवकरच विविध फळे आणि भाजीपाल्यांसाठीचा थिंक टॅंक तयार करून, शासनाला विविध पिकांसाठीची धोरणे ठरविण्यासाठीची माहिती शासनाला दिली जाणार आहे. 

याबाबतची माहिती राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. पवार म्हणाले, ‘‘शेतमालाच्या उत्पादन व विक्री यांचा ताळमेळ घालण्यासाठी उत्पादनाबरोबर प्राथमिक प्रक्रिया, विपणन, प्रक्रिया, बाजारभाव यासाठी पीकनिहाय विचार गटाची आवश्‍यकता आहे. हा विचार गट संबंधित पिकाचे क्षेत्र, उत्पादन बाजारपेठ आदींचा विचार करून, योग्य दर मिळण्यासाठी प्रयत्नशिल असणार आहे. 

‘‘केवळ शेतमाल विक्रीवर अवलंबून न राहता, देशांतर्गत बाजारपेठे बरोबरच निर्याती आणि प्रक्रियेसाठीचा विचार करावा लागणार आहे. यासाठी पणन मंडळाने आठ राज्यांंमध्ये विक्री प्रतिनिधींची नियुक्ती केली होती. या प्रतिनिधींनी दिलेल्या अहवालाचे संकलन सुरू असून, कोणत्या राज्यात कोणत्या शेतमाला पुरवठ्याची गरज आहे. या माहितीची आकडेवारीचे संकलन सुरू आहे. याच धर्तीवर राज्यातील महत्त्वाच्या शेतमालासाठीचे विचार गट स्थापन करुन, त्यांच्याकडून विविध पिकांच्या समस्या, उत्पादन, विपणन, बाजारभाव, प्रक्रिया, निर्यात, देशांतर्गत बाजारपेठ, मूल्यसाखळी आदी विविध मुद्यांवर माहिती संकलन केली जाणार आहे. ही माहिती योजना आणि धोरण निर्मितीसाठी शासनाला सादर केली जाणार आहे.

असे असतील ‘थिंक टॅंक’मधील प्रतिनिधी पणन संचालक, पणन मंडळ, फलोत्पादन संचालक, अपेडा (मुंबई), कृषी विद्यापीठांतील संबंधित पिकाचे विशेषज्ज्ञ, संबंधित पिकाचे शेतकरी, निर्यातदार, इतर निमंत्रित तज्ज्ञ

या पिकांसाठी असेल ‘थिक टॅंक’  हापूस आणि केशर आंबा, केळी, संत्रा, मोसंबी, डाळिंब, द्राक्षे, कांदा, पपई, सीताफळ, पेरू, अंजीर, विविध फुले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com