सांगली जिल्ह्यात डाळिंबाच्या हंगामाची तयारी जोमात

Preparation of pomegranate season in Sangli district is in full swing
Preparation of pomegranate season in Sangli district is in full swing

सांगली : या वर्षीचा डाळिंब हंगाम संपला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील हंगामाची प्राथमिक तयारी जोमात सुरू केली आहे. मृग हंगामातील बहार धरण्यासाठी डाळिंब बागांच्या छाटणीसाठी लगबग उडाली आहे. डाळिंब छाटणीच्या कामाला वेग आला आहे.

आटपाडी तालुक्यात आठ ते दहा हजार हेक्‍टर क्षेत्र डाळिंबाचे आहे. दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. गेल्या वर्षी मृग बहारात हंगाम धरलेल्या बागांचा हंगाम जवळपास संपला आहे. डाळिंब उत्पादक यावर्षीच्या हंगाम भरण्याच्या तयारीला लागला आहे. काही शेतकरी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हंगाम धरण्याची तयारी करू लागले आहेत. तर काहींची जून-जुलै महिन्यात बागा धरण्याची लगबग सुरू झाली आहे.

गेल्या महिन्यापासून बागा छाटणीची कामे वेगात सुरू आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी हलकी छाटणी घेऊन शेण खते घालून काडी तयार करण्यासाठी पाणी सुरू केले आहे. काही शेतकऱ्यांनी पूर्ण छाटणी करून काडी वाळू नये, यासाठी जेमतेम पाणी सुरू केले आहे. छाटणीसाठी कामगारांची टंचाई जाणवत आहे. छाटणीच्या टोळीकडे शेतकऱ्यांनी आगोदरच नंबर लावले आहेत. 

‘टेंभू’च्या पाण्याची गरज

जून आणि जुलै महिन्यातील बागांना काही दिवसांतच चाचरणी करून खते घातली जाणार आहेत. गत हंगाम शेतकऱ्यांना अपेक्षित असा गेला नाही. शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. बागा छाटणे, चाचरणे, शेणखते घालणे, बॉर्डची फवारणी आदी कामांना वेग आला आहे. काही ठिकाणी बागांना पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आहे. तेथे टेंभूच्या पाण्याची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com