आगामी खरीप हंगामाची तयारी

आगामी खरीप हंगामाची तयारी
आगामी खरीप हंगामाची तयारी

जळगाव : खानदेशचे प्रमुख पीक म्हणून कापसाची ओळख आहे. पुढील हंगामासंबंधी शेतकऱ्यांप्रमाणे कृषी विभागाने प्राथमिक तयारी, अंदाज बांधायला सुरवात केली आहे. आगामी (२०१९-२०) हंगामात पूर्वहंगामी (बागायती) कापसाखालील क्षेत्र कमी असेल, अशी शक्‍यता आहे. त्यानुसार कापूस बियाणे, रासायनिक खतांची तयारी सुरू आहे. 

सर्वाधिक चार लाख ७० ते ७५ हजार हेक्‍टर कापूस लागवड जळगाव जिल्ह्यात, दोन लाख हेक्‍टर धुळ्यात, एक लाख तीन हजार ते ९० हजार हेक्‍टरवर लागवड नंदुरबारात होईल. देशी वाणांचा आग्रह शेतकरी करीत आहेत. परंतु कृषी विभागाने ९५ टक्के क्षेत्रासंबंधी बीटी कापूस बियाण्याचा वापर होतो, असा जुना अंदाज कायम आहे. बीटी कापसाचे बियाणेच अधिक येईल, असे सांगितले

जात आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे २३ लाख पाकिटे, धुळ्यात सात ते आठ लाख आणि नंदुरबारातही चार ते साडेचार लाख कापूस बियाण्याच्या पाकिटांचा पुरवठा करून घेण्यावर कृषी विभाग भर देणार आहे. सध्या प्राथमिक अंदाज बियाण्याबाबत बांधला जात असला तरी ऐनवेळी त्यात बदल केले जाऊ शकतील.

पुरवठ्यासंबंधी ठोस मागणी अजून केलेली नाही.  आगामी हंगामातही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पूर्वहंगामी कापूस लागवड व्हावी, यासंबंधी तज्ज्ञ, कृषी विभाग आग्रही आहे. कारण गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र नष्ट करण्यासाठी लागवड जूनच्या सुरवातीला व्हायला हवी, असा मुद्दा तज्ज्ञ सांगत आहेत. अशातच खानदेशात तापी काठ वगळता सर्वत्र जलसंकट असल्याने मे महिन्याच्या अखेरीस होणारी पूर्वहंगामी कापूस लागवड कमी होईल.

जळगाव जिल्ह्यात मागील हंगामात सुमारे ८५ हजार हेक्‍टरवर पूर्वहंगामी कापूस लागवड झाली होती. धुळे, नंदुरबारातही मिळून ३५ हजार हेक्‍टरवर पूर्वहंगामी कापूस होता. आगामी हंगामात मात्र ही लागवड निम्म्याने कमी होऊ शकते, असेही सांगितले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com