Agriculture news in marathi Preparations for Amravati district for cotton procurement season begin | Agrowon

`अमरावती जिल्ह्यात कापूस खरेदी हंगामाच्या दृष्टीने पूर्वतयारी सुरू`

टीम अॅग्रोवन
शनिवार, 3 ऑक्टोबर 2020

अमरावती : मूग, उ़डीद खरेदीला सुरुवात व सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात झाल्यानंतर आता कापूस खरेदी हंगाम २०२०-२१ ची पूर्वतयारीही शासनाकडून करण्यात येत आहे. 

अमरावती : मूग, उ़डीद खरेदीला सुरुवात व सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात झाल्यानंतर आता कापूस खरेदी हंगाम २०२०-२१ ची पूर्वतयारीही शासनाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातही कापूस खरेदीच्या दृष्टीने सुरुवातीपासूनच नियोजन करावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. 

महाराष्ट्रात कृषी खात्याच्या अंदाजानुसार सन २०२०-२१ हंगामामध्ये ४२,०७ लाख हेक्टर इतक्या क्षेत्रावर कापसाचे पीक घेण्यात आले आहे. त्यानुसार राज्यात ४५० लाख क्विंटल कापूस (९०० लाख गाठी) उत्पादन अपेक्षित आहे. याचा विचार करून शासनाकडून भारतीय कपास महामंडळ (सीसीआय), महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाला कापूस खरेदीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

कोरोनाची परिस्थिती असतानाही पणन माहासंघाने राज्यात गत १० वर्षांतील विक्रमी कापसाची खरेदी केली. अमरावती जिल्ह्यातही खरेदी केंद्रांची संख्या वाढविणे, मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आदीद्वारे मोठी कापूस खरेदी झाली. येत्या हंगामातही योग्य नियोजन करावे, असे निर्देश अॕड. ठाकूर यांनी दिले. जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीशी समन्वय ठेवून कापूस खरेदीचे नियोजन करावे. प्रत्येक कापूस खरेदी केंद्रावर किमान एक ग्रेडर असावा.

कापूस खरेदी पूर्वीच कृषि विभागामार्फत आवश्यक ते मुनष्यबळ ग्रेडर म्हणून द्यावे. त्यांना हंगामपूर्व प्रशिक्षण देऊन नेमणुकीचे आदेश द्यावे. साठवणुकीची व्यवस्था, गोदाम, शेड, ताडपत्रीची व्यवस्था करावी, अशा सूचनाही ॲड. ठाकूर यांनी दिल्या. बाजार समितीच्या स्तरावर शेतकरी निहाय नोंदवही, रेकॉर्ड ठेवावे. ज्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नाव, पत्ता, बँक खात्याचा तपशील असावा. कापूस खरेदी केंद्रावर आणण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांना ठिकाण व वेळ संदेशाद्वारे पाठवा, आदी सूचनाही देण्यात आल्या.


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...