Agriculture news in marathi Preparations for distribution of peak loans in Rabbi by the administration in Khandesh | Agrowon

खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज वाटपाची तयारी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 सप्टेंबर 2021

जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची तयारी सुरू आहे. बँका ऑक्टोबरपासून हे कर्ज वितरण सुरू करतील. सुमारे ६०० कोटी रुपये पीककर्ज रब्बीसंबंधी दिले जाईल, अशी माहिती आहे. 

जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची तयारी सुरू आहे. बँका ऑक्टोबरपासून हे कर्ज वितरण सुरू करतील. सुमारे ६०० कोटी रुपये पीककर्ज रब्बीसंबंधी दिले जाईल, अशी माहिती आहे. 

खरिपातील पीककर्ज सुमारे ७५ टक्के वितरित झाले आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे २८०० कोटी रुपये पीककर्ज वितरण लक्ष्यांक होता. धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे ११०० कोटी रुपये पीककर्ज खरिपात वितरित करायचे होते. हे पीककर्ज बऱ्यापैकी वितरित झाले आहे. 

रब्बी हंगाम अधिकृतपणे ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. या हंगामातही पीककर्जाचे प्रस्ताव शेतकरी तयार करीत आहेत. काही नवे प्रस्तावदेखील तयार होत आहेत. प्रशासनानेदेखील बँकांकडून मध्यंतरी रब्बी पीककर्ज वितरणाची माहिती मागितली होती. रब्बी पीककर्जासंबंधी जळगाव जिल्ह्यात सुमारे ४५० कोटी रुपयांची तरतूद करणे आवश्यक आहे. 

धुळे व नंदुरबारात सुमारे १५० कोटी रुपये वितरित केले जातील. रब्बीमध्ये केळी, ऊस, पपई, ज्वारी आदी पिकांसाठी पीककर्ज वितरण केले जाईल. यंदा हे पीककर्ज अधिकचे आवश्यक आहे. कारण खरिपात पिकांची मोठी हानी झाली आहे. अनेक शेतकरी कर्ज बोजा नसलेल्या खात्यांवर किंवा शेत जमिनीवर पीककर्ज घेतील. 

सर्च रिपोर्टचा खर्च कमी करा

पीककर्जासंबंधी अनेक शेतकरी सर्च रिपोर्ट तयार करीत आहेत. बँकांनी त्यासाठी काही वकिलांची नियुक्ती केली आहे. त्यासाठी १ ते दीड हजार रुपये खर्च येत आहे. हा खर्च कमी करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. तसेच सर्च रिपोर्टसाठी फक्त मागील पाच वर्षांतील नोंदी, फेरफार यांची सक्ती करावी, अशी मागणीदेखील केली जात आहे. काही बँका मागील २० ते २५ वर्षांतील नोंदी, फेरफार यांची मागणी करतात. परंतु ही बाब योग्य नाही, असा मुद्दाही शेतकरी उपस्थित करीत आहेत.


इतर बातम्या
‘शेतकरीवाटा वसुली’त चाळीस अधिकाऱ्यांची...पुणे ः राज्यात गाजत असलेल्या कथित अवजारे व...
तापमानात चढ-उतार सुरूचपुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच...
दहा वर्षाआतील वाणांनाच अनुदान द्यावेअकोला ः सध्या रब्बी हंगामात हरभरा व इतर पिकांच्या...
मॉन्सूनचा देशाला निरोपपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशाचा...
युरोपातील वादाचा तांदूळ निर्यातीवर...पुणे : भारतातून आयात केलेल्या तांदळापासून पिठी...
शरद पवार, नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ...नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे माजी...
शेती, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी संशोधन...परभणी ः कृषी विद्यापीठातून बाहेर पडणारे दहा ते...
तलाठी दप्तराची झाडाझडती जळगाव ः नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण...
पुण्यात रब्बी पेरण्यांना सुरुवातपुणे : परतीचा पाऊस गेल्याने पहाटेचा गारठा वाढू...
निवडणुकीत होणार महाविकास आघाडी? सांगली : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि...
जांभा गावाच्या संपूर्ण पुनर्वसनाचा...अकोला : मूर्तीजापूर तालुक्यातील काटेपूर्णा बॅरेज...
'रासाका' सुरू करण्याच्या आश्वासनाची...नाशिक : निफाड तालुक्यातील ''रासाका'' म्हणजेच...
खानदेशात कांदेबाग केळीची लागवड निम्मीचजळगाव ः  खानदेशात कांदेबाग केळी...
रिसोड, जि. वाशीम :‘पळसखेड’च्या अर्धवट... रिसोड, जि. वाशीम : शासनासह अधिकाऱ्यांच्या...
नगर जिल्ह्यातील अतिरिक्त उसाबाबत मार्ग... नगर : नेवासे तालुक्यासह नगर जिल्ह्यातील...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत एक लाख...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या...
‘ट्वेन्टीवन शुगर्स’कडून कोट्यावधीचे...परभणी ः सन २०२०-२१ च्या हंगामात गाळप केलेल्या...
निकृष्ठ दर्जाच्या धान खरेदीवर नियंत्रण...नागपूर  : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
आधार प्रमाणीकरणास १५ नोव्हेंबरपर्यंत...धुळे : ‘‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
वन उद्यानाद्वारे जिल्ह्याच्या पर्यटन...नाशिक : ‘‘जिल्ह्याला धार्मिक, ऐतिहासिक या सोबतच...