Agriculture news in marathi Preparations for sale of fruits, grains of farmers groups in Aurangabad | Agrowon

औरंगाबादेत शेतकरी गटांची फळे, धान्य विक्रीची तयारी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 मार्च 2020

औरंगाबाद : जिल्ह्यातील जवळपास चाळीस गावांतील शेतकरी गटांनी आपल्याकडील उत्पादित फळे भाजीपाला व धान्याची थेट ग्राहकांना विक्री करण्याची तयारी दाखवली आहे. या शेतकरी गटांना विक्रीसाठी वाहन परवाने मिळवून देण्यासाठी कृषी विभागानेही हालचाली गतिमान केल्या आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यातील जवळपास चाळीस गावांतील शेतकरी गटांनी आपल्याकडील उत्पादित फळे भाजीपाला व धान्याची थेट ग्राहकांना विक्री करण्याची तयारी दाखवली आहे. या शेतकरी गटांना विक्रीसाठी वाहन परवाने मिळवून देण्यासाठी कृषी विभागानेही हालचाली गतिमान केल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य व देश पातळीवर लॉकडाऊन करण्यात आला आहे. सर्वत्र संचारबंदी लागू असल्याने शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या जीवनावश्यक शेतीमालाच्या विक्रीचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून कृषी आयुक्तालयाच्या माध्यमातून सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांकडे उत्पादित फळे भाजीपाला व धान्याच्या विक्रीत वाहतुकीसह इतर अडचणी येत असल्यास त्या प्राधान्याने सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

त्यानुसार औरंगाबाद उस्मानाबाद व इतर जिल्ह्यात कोणत्या गावातील कोणत्या शेतकरी गटाकडे कोणता भाजीपाला फळे व धान्य विक्रीसाठी उपलब्ध आहे ते कुठे विक्री करू इच्छितात याविषयीची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या माहिती संकलनाला औरंगाबाद जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, वैजापूर, कन्नड, गंगापूर, फुलंब्री, सिल्लोड, पैठण, सोयगाव, खुलताबाद आदी तालुक्यांतील जवळपास चाळीस गावांतील शेतकरी गटांनी त्यांच्याकडे नेमका कोणत्या प्रकारचा भाजीपाला फळे व धान्य उपलब्ध आहे याची माहिती कृषी विभागाकडे नोंदविले आहे. 

या माहितीच्या आधारे कृषी विभाग व आत्माच्या माध्यमातून संबंधित शेतकरी गट ज्या शहरात गावात वा भागात उत्पादित मालाची विक्री करू इच्छित असेल त्याविषयीचा वाहतूक परवाना आरटीओ कार्यालयाकडून मिळवून देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शेतकरी गटांकडून थेट ग्राहकांना फळे भाजीपाला व धान्य विक्रीचे काम सुरू झाल्यास एकाच ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी होणारी गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे.

माझ्या दहा एकरांतील टरबूज व दहा एकरातील टोमॅटो विक्रीचा प्रश्न निर्माण झाला होता. गुरुवारी (ता. २६) कृषी विभागाशी संपर्क केल्यानंतर आरटीओ कार्यालयाकडून जवळपास तासाभरात मला वाहनाच्या वाहतुकीचा परवाना मिळाल्याने टरबूज व टोमॅटो विक्रीसाठी आवश्यक वाहतूक करण्याचा प्रश्न मार्गी लागला.
- संतोष जाधव, शेतकरी हातनूर जी औरंगाबाद.

जिल्ह्यातील विविध गावांतील शेतकरी गटांनी त्यांच्याकडे उत्पादित फळे भाजीपाला व धान्य  विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. या या माहितीला अनुसरून त्यांना अपेक्षित मदत व थेट विक्रीसाठी वाहतुकीचा परवाना देण्याचे काम सुरू आहे. 
- डॉ तुकाराम मोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, औरंगाबाद
 


इतर ताज्या घडामोडी
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...
जळगाव जिल्ह्यात मका, ज्वारी खरेदीसाठी...जळगाव : जिल्ह्यात शासकीय केंद्रात हमीभावात मका व...
कापूस खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवा...जळगाव : शासकीय कापूस खरेदीला गती देण्यासाठी...
शेतकऱ्यांनो पीक कर्जाबाबत निश्चित राहा...नाशिक : ‘‘महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १७ लाख...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नांदेडमध्ये पीककर्जाच्या ऑनलाइन...नांदेड : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील...
इंदापुरात मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी...पुणे ः इंदापूर तालुका कृषी उत्पत्र बाजार...
थकीत एफआरपी द्या ः बळीराजा शेतकरी संघटनासातारा : कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले...
जालन्यातील ७६२ तूर उत्पादकांना...जालना : जिल्ह्यातील सहा हमी दर खरेदी केंद्रांवरून...
अमरावतीत २५ जिनींगव्दारे कापूस खरेदीअमरावती ः खरिपाच्या पार्श्‍वभूमीवर कापूस खरेदीला...
सोलापुरात खते, बियाणे थेट शेतकऱ्यांच्या...सोलापूर : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना थेट...
पुणे बाजार समिती उद्यापासून सुरू होणारपुणे ः कोरोना टाळेबंदीमुळे गेली सुमारे दीड...
चांदोरीत शॉर्टसर्किटमुळे १० एकर ऊस खाक चांदोरी, जि. नाशिक : निफाड तालुक्यातील चांदोरी...
बाजार समित्यांनी सीसीआयला मनुष्यबळ...वर्धा ः सीसीआयकडे आवश्‍यक ग्रेडर कमी आहेत....
औरंगाबादमध्ये खरिपातील बियाणे विक्री...औरंगाबाद : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजना सुरूच...पुणे : गटशेती तसेच फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या...
कृषी निविष्ठा बांधावर उपलब्ध करुन द्या...पुणे ः खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खते...
माॅन्सूनपूर्वी करा कापसाची खरेदी ः...अमरावती ः वरुड तालुक्‍यात लॉकडाऊनमुळे सीसीआय तसेच...
टोळधाडबाधीत क्षेत्रातील मदतीचे प्रस्ताव...अमरावती ः जिल्ह्यात टोळधाडीच्या झुंडीने केलेल्या...
ताकारी योजनेचे पाणी चिखलगोठणला पोहोचलेसांगली ः ताकारी उपसा जलसिंचन योजनेच्या सुरू...