दुष्काळी भागात चाराटंचाई निवारण्यासाठी प्रशासन सज्ज

दुष्काळी भागात चाराटंचाई निवारण्यासाठी प्रशासन सज्ज
दुष्काळी भागात चाराटंचाई निवारण्यासाठी प्रशासन सज्ज

बुलडाणा ः कमी पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली अाहे. चाराटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या २५ जानेवारीच्या निर्णयानुसार दुष्काळ जाहीर केलेल्या भागात महसूल मंडळ स्तरावर चारा छावण्या सुरू करण्याबाबत शासन निर्देशाप्रमाणे कार्यवाही केल्या जाणार आहे. स्थानिक पशुपालकांच्या मागणीनुसार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून चारा छावण्या उघडण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. या वेळी तालुकास्तरीय चाराटंचाई निवारण समितीची शिफारस आवश्यक असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी दिली.

चाराटंचाई संदर्भात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललित वराडे, पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. पी. जी बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. के. एम ठाकरे, सहायक आयुक्त डॉ. एन. एच बोहरा, तालुकास्तरीय पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या भागांमध्ये विविध प्रकारच्या सवलती लागू केल्या आहेत. चाराटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. संभाव्य चाराटंचाईची शक्यता लक्षात घेता प्रशासन सज्ज आहे. पशुपालकांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणांनी कार्यवाही करावी, असेही त्या म्हणाल्या. जिल्ह्यातील चाराटंचाई लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाच्या तालुकास्तरीय यंत्रणेने सजग राहण्याच्या सूचना देत त्या म्हणाल्या, गावागावात चाऱ्याची उपलब्धता, चाऱ्याची तूट व सदर तूट भरून काढण्यासाठी केलेल्या उपाययोजना याबाबतचा आढावा घेण्यासाठी तालुकास्तरीय चाराटंचाई निवारण समिती गठित करण्यात आली आहे.

 या समितीने साप्तािह‍क आढावा बैठक तहसिल कार्यालयात घ्यावी. बैठकीत तालुक्यातील चाऱ्याचा वस्तुनिष्ठ साप्ताहिक अहवाल सादर करावा. पशुसंवर्धन विभागाच्या अहवालानुसार मार्चपर्यंत जिल्ह्यात चाराटंचाई भासण्याची शक्यता नाही. तथापि एप्रिल, मे अाणि जूनमध्ये चाऱ्याची तूट, रब्बी हंगामातील उत्पादित चारा व विहित योजनांद्वारे मिळणारे चारा उत्पादन लक्षात घेता जिल्ह्यात चाराटंचाई निर्माण झाल्या ती परिस्थिती प्रशासन यशस्वीपणे हाताळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com