चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज

चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज
चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज

मुंबई ः लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात येत्या सोमवारी (ता. २९) राज्यातील १७ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. या वेळी ३ कोटी ११ लाख ९२ हजार ८२३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात १ कोटी ६६ लाख ३१ हजार पुरुष तर १ कोटी ४५ लाख ५९ हजार महिला मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

या लोकसभा मतदारसंघांमध्ये १०२ विधानसभा मतदारसंघ असून ३३ हजार ३१४ मतदान केंद्र आहेत. सुमारे १ लाख ७ हजार ९९५ ईव्हीएम (बीयू आणि सीयू) तर ४३ हजार ३०९ व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण तीन टप्प्यांमध्ये ३१ मतदारसंघांमध्ये मतदान शांततेत पार पडले. शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी तयारी सुरू आहे. मतदान केंद्रांवर आवश्यक असणाऱ्या सुविधांबाबत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. सखी मतदार केंद्र, दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअर, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सावलीसाठी मंडप अशा सोयी यापूर्वी झालेल्या मतदान प्रक्रियेत पुरविण्यात आल्या आहेत.

नंदुरबार (अ.ज.), धुळे, दिंडोरी (अ.ज.), नाशिक, पालघर (अ.ज.), भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरूर आणि शिर्डी (अ. जा.) या लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.  

मतदारसंघनिहाय मतदार आणि मतदान केंद्रांची संख्या 
मतदारसंघ मतदार संख्या मतदान केंद्रे
नंदुरबार १८ लाख ७० हजार ११७ २११५
धुळे  १९ लाख ४ हजार ८५९ १९४०
दिंडोरी १७ लाख २८ हजार ६५१ १८८४
नाशिक १८ लाख ८२ हजार ४६ १९०७
पालघर १८ लाख ८५ हजार २९७ २१७०
भिवंडी १८ लाख ८९ हजार ७८८ २२००
कल्याण १९ लाख ६५ हजार १३१ २०६३
ठाणे २३ लाख ७० हजार २७६ २४५२
मुंबई उत्तर १६ लाख ४७ हजार २०८ १७१५
मुंबई उत्तर-पश्चिम १७ लाख ३२ हजार १७६६
मुंबई उत्तर-पूर्व १५ लाख ८८ हजार ३३१ १७२१
मुंबई उत्तर-मध्य १६ लाख ७९ हजार ७३२ १७२१
मुंबई दक्षिण-मध्य १४ लाख ४० हजार १४२ १५७२
मुंबई दक्षिण १५ लाख ५३ हजार ९२५ १५७८
मावळ २२ लाख ९७ हजार ४०५ २५०४
शिरूर २१ लाख ७३ हजार ५२७ २२९६
शिर्डी १५ लाख ८४ हजार १७१०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com