मॉन्सूनच्या पार्श्‍वभूमीवर उपाययोजनांची तयारी करा : केंद्रेकर

औरंगाबाद : ‘‘पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांची तातडीने सोडवणूक करण्यासाठी मान्सून आगमनाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी आवश्यक उपाययोजनांची तयारी करावी’’, असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले.
Prepare measures against the backdrop of monsoon: Kendrakar
Prepare measures against the backdrop of monsoon: Kendrakar

औरंगाबाद : ‘‘पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांची तातडीने सोडवणूक करण्यासाठी मान्सून आगमनाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी आवश्यक उपाययोजनांची तयारी करावी’’, असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले. 

विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी (ता. २६) विभागीय मान्सून पूर्वतयारी बाबतची बैठक केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपायुक्त, मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. 

केंद्रेकर म्हणाले, ‘‘पावसाळ्यात नदी काठच्या गावांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. मराठवाड्यातील गोदावरी काठच्या १५७२ गावांत प्राधान्याने विशेष नियंत्रण व्यवस्था तयार ठेवावी. ज्या गावांत वसाहतींत अति पर्जन्यमानाची शक्यता आहे, अशा ठिकाणची गावे स्थलांतरासाठी पर्यायी व्यवस्था, शाळा, इतर सुरक्षित ठिकाणे तयार ठेवावी. जिल्हा परिषदेने सर्व तलाव, पाझर तलाव, नद्या, काठावरच्या गावांची प्रत्यक्ष पाहणी करुन संरक्षणाचे उपाय योजावे. ज्या ठिकाणी तलाव, धरणाच्या भिंती, दरवाजे, इतर बाबींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे, ती कामे तातडीने पूर्ण करावी. महावितरणने विद्युत खांब, विद्युत प्रवाह करणाऱ्या तारा, या सुव्यवस्थित आहेत का, पावसाच्या, वादळाच्या स्थितीत त्या धोकादायक बनणार नाही, याची खबरदारी घ्यावी. ’’ 

नदीकाठच्या, धरणाजवळच्या गावांमध्ये सरपंचाची बैठक घेऊन नियंत्रण व्यवस्थापन सज्ज ठेवावे. धरणातील पाण्याची आवक, पाणीपातळी, होणारा पाण्याचा विसर्ग इत्यादी बाबींचे सनियंत्रण करा. पाणी साठा, धरण सुरक्षा, पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर करावयाची उपाययोजना याबाबत आराखडा निश्चित करावा. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत जिल्हा नियंत्रण कक्ष व नागरिकांना त्वरित सूचना द्याव्या, अशा सूचना केंद्रेकर यांनी दिल्या.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com