अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार करा

अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार करा
अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार करा

राधानगरी, जि. कोल्हापूर ः ‘अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसन पॅकेज रकमेत वाढ करण्याच्या मागणीचा प्रभावी पाठपुरावा करू, पुनर्वसन कार्यवाही कालबद्ध कृतिआराखडा तयार करून, वेळीच करावी. आता आणखी उशीर लावू नये,’ असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.

विस्तारित राधानगरी वन्यजीव अभयारण्यातील समाविष्ट खेड्यांतील कुटुंबांच्या पुनर्वसन कार्यवाहीबाबतची आढावा बैठक वन्यजीव कार्यालयात झाली. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार कार्यवाहीच्या आढाव्यासाठी पुन्हा दोन ऑक्‍टोबरला बैठक घेण्याचा निर्णय झाला. बैठकीला राधानगरीच्या प्रांताधिकारी मनीषा कुंभार, तहसीलदार शिल्पा ओसवाल, उपविभागीय अधिकारी (वन्यजीव) विजय खेडकर, प्रभारी सहायक उपवन संरक्षक प्रशांत तेंडुलकर, अभयारण्यग्रस्त गावांचे सरपंच उपस्थित होते.

आमदार आबिटकर म्हणाले, ‘स्वेच्छा पुनर्वसन योजनेतील जाचक अटी व नियम शिथिल होण्यासाठी लवकरच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत वन्यजीव व महसूल अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन होईल. पुनर्वसन पॅकेजची रक्कम संबंधित कुटुंबाला विनाविलंब अदा करण्यात यावी. वन्यजीव व महसूल यंत्रणेने समन्वयाने काम केले, तरच पुनर्वसन प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल.’

बैठकीत अभयारण्यग्रस्तांनी पुनर्वसन कार्यवाहीतील त्रुटी रखडत सुरू राहिलेली कार्यवाही, दुसऱ्या टप्प्यातील पॅकेज रक्कम मिळण्याची किचकट व गुंतागुंतीची प्रक्रिया याकडे लक्ष वेधले. काहींनी भावनिक होऊन व्यथा मांडल्या. स्वेच्छा पुनर्वसन योजनेबाबत अभयारण्यग्रस्त कुटुंबांत परस्परविरोधी भूमिका बैठकीतील चर्चेतून समोर आल्या.

स्वेच्छा पुनर्वसन पॅकेजसाठी आठ कोटी निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. ज्या खेड्यांतील सर्व कुटुंबे स्वेच्छा पुनर्वसनासाठी मागणी संमती देतील, त्या खेड्यांचे येथून पुढे प्राधान्याने पुनर्वसन केले जाईल. अभयारण्यग्रस्तांच्या स्वमालकीच्या जमिनी, झाडे, यांचे फेरमूल्यांकन करून, त्यातील त्रुटी दूर केल्या जातील. निश्‍चित वेळेत पुनर्वसन होईल यावर भर दिला जाईल. - प्रभुनाथ शुक्‍ल, उपवनसंरक्षक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com