रब्बी ज्वारी पेरणीची पूर्वतयारी

पेरणीपूर्वी बियाण्यास गंधक ४ ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅम प्रति १ किलो बियाणे. त्यानंतर ॲझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरिलिअम किंवा पीएसबी २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे.
Proper seed treatment should be done on the seeds before sowing
Proper seed treatment should be done on the seeds before sowing

पेरणीपूर्वी बियाण्यास गंधक ४ ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅम प्रति १ किलो बियाणे. त्यानंतर ॲझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरिलिअम किंवा पीएसबी २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. सप्टेंबर पहिला पंधरवडा- शेतजमीन पेरणीसाठी तयार करावी  सप्टेंबर दुसरा पंधरवडा - खालील शिफारशीनुसार ज्वारीची पेरणी करावी. जमिनीच्या प्रकारानुसार शिफारशीप्रमाणे जातींची निवड करावी. 

जमिनीचा प्रकार जातीचे नाव जिरायत/बागायत
हलकी जमीन फुले अनुराधा  जिरायत
मध्यम जमीन फुले सुचित्रा   जिरायत
भारी जमीन फुले वसुधा जिरायत
मध्यम ते भारी जमीन फुले रेवती   बागायत
विशेष उपयोगासाठी फुले मधुर-हुरडा    जिरायत
फुले पंचमी-लाह्या   जिरायत
फुले रोहिणी-पापड  जिरायत

  जमिनीच्या प्रकारानुसार रासायनिक खताची मात्रा शिफारशीप्रमाणे द्यावी.

जमिनीचा प्रकार खताचे हेक्टरी प्रमाण (किलो/हे)
कोरडवाहू बागायती
नत्र स्फूरद पालाश नत्र स्फूरद पालाश 
हलकी  २५ -- -- -- -- --
मध्यम  ४० २० --  ८० ४० ४०
भारी  ६०   ३० --  १००  ५० ५०

नत्र दोन हप्त्यांत (पेरणीवेळी निम्मे व पेरणीनंतर एक महिन्याने निम्मे) संपूर्ण स्फूरद व पालाश पेरणी वेळेस द्यावे. कोरडवाहू जमिनीस संपूर्ण नत्र व स्फूरद पेरणीवेळेस द्यावे.  बीजप्रक्रिया  पेरणीपूर्वी बियाण्यास गंधक ४ ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅम प्रति १ किलो बियाणे. त्यानंतर ॲझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरिलिअम किंवा पीएसबी २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे.  बियाण्याचे प्रमाण व पेरणीचे अंतर पेरणीसाठी हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे. दोन ओळीतील अंतर ४५ सें. मी. व दोन रोपातील अंतर १५ सें. मी. ठेवावे.  खोडमाशी नियंत्रण  पेरणीनंतर ७-८ दिवसांनी, क्विनॉलफॉस (२५ ईसी प्रवाही) ७५० मिली प्रति ५०० लिटर पाणी प्रति हेक्टरी फवारणी करावी. संपर्क- डॉ. पंडित खर्डे, ८२७५०३३८२२ (प्रभारी अधिकारी, प्रसारण केंद्र,  महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com