Presence of post-monsoon rains in Ratnagiri district
Presence of post-monsoon rains in Ratnagiri district

रत्नागिरी जिल्ह्यात माॅन्सूनोत्तर पावसाची हजेरी

रत्नागिरी ः अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली होती. जिल्ह्यातील अनेक भागात बुधवारी (ता.१) पहाटेपासून पावसाने हजेरी लावली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता, मात्र आंबा बागायतदार धास्तावले आहेत.

रत्नागिरी ः अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली होती. जिल्ह्यातील अनेक भागात बुधवारी (ता.१) पहाटेपासून पावसाने हजेरी लावली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता, मात्र आंबा बागायतदार धास्तावले आहेत.

मंगळवारी रात्रीपासून अचानक हलका पाऊस सुरु झाला. त्यानंतर पावसाचा जोर वाढला. सुमारे दोन तास चिपळूण, रत्नागिरी, लांजा व राजापूर तालुक्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा दणका बसला. पहाटेच्या दरम्यान, पावसाचा जोर कमी झाला होता. पुन्हा सकाळी हजेरी लावली. दुपारीही तुरळक सरी पडल्या. पावसामुळे फुलकिडा वा तुडतुड्याचा प्रादुर्भाव होण्याच्या शक्यतेने अनेक बागायतदार सध्या बागांमध्ये औषध फवारणी करीत असल्याचे चित्र आहे. त्यांच्या फवारणीची कामे वेगाने सुरू असताना अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या बागायतदारांवर दुबार फवारणी करण्याची नामुष्की ओढवली आहे. 

फवारणीचा खर्च नाहकपणे दुप्पट होणार आहे. त्यामुळे बागायतदारांच्या चेहऱ्यावर चिंता उमटल्या आहेत. प्रतिकूल वातावरणासोबतच गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण राहिले. त्यातून मोहोरासह पाना-फांद्यावर चिकटा वाढण्याची भीती बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यातच, केवळ मोहोर चांगला येऊन उपयोग नाही. त्याचे परागीकरण किती प्रमाणात होणार, यावर उत्पन्न अवलंबून आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राहिलेले ढगाळ वातावरण, त्यानंतर पाऊस याने बागायतदारांची चिंता वाढविली आहे. अवकाळी पाऊस, प्रतिकूल आणि ढगाळ वातावरणाचा फुलोऱ्यावर किती आणि कसा परिणाम भविष्यामध्ये होणार आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. - मनोहर गुरव, बागायतदार.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com