Agriculture news in marathi Presence of post-monsoon rains in Ratnagiri district | Page 2 ||| Agrowon

रत्नागिरी जिल्ह्यात माॅन्सूनोत्तर पावसाची हजेरी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 डिसेंबर 2021

रत्नागिरी ः अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली होती. जिल्ह्यातील अनेक भागात बुधवारी (ता.१) पहाटेपासून पावसाने हजेरी लावली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता, मात्र आंबा बागायतदार धास्तावले आहेत.

रत्नागिरी ः अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली होती. जिल्ह्यातील अनेक भागात बुधवारी (ता.१) पहाटेपासून पावसाने हजेरी लावली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता, मात्र आंबा बागायतदार धास्तावले आहेत.

मंगळवारी रात्रीपासून अचानक हलका पाऊस सुरु झाला. त्यानंतर पावसाचा जोर वाढला. सुमारे दोन तास चिपळूण, रत्नागिरी, लांजा व राजापूर तालुक्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा दणका बसला. पहाटेच्या दरम्यान, पावसाचा जोर कमी झाला होता. पुन्हा सकाळी हजेरी लावली. दुपारीही तुरळक सरी पडल्या. पावसामुळे फुलकिडा वा तुडतुड्याचा प्रादुर्भाव होण्याच्या शक्यतेने अनेक बागायतदार सध्या बागांमध्ये औषध फवारणी करीत असल्याचे चित्र आहे. त्यांच्या फवारणीची कामे वेगाने सुरू असताना अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या बागायतदारांवर दुबार फवारणी करण्याची नामुष्की ओढवली आहे. 

फवारणीचा खर्च नाहकपणे दुप्पट होणार आहे. त्यामुळे बागायतदारांच्या चेहऱ्यावर चिंता उमटल्या आहेत. प्रतिकूल वातावरणासोबतच गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण राहिले. त्यातून मोहोरासह पाना-फांद्यावर चिकटा वाढण्याची भीती बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यातच, केवळ मोहोर चांगला येऊन उपयोग नाही. त्याचे परागीकरण किती प्रमाणात होणार, यावर उत्पन्न अवलंबून आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राहिलेले ढगाळ वातावरण, त्यानंतर पाऊस याने बागायतदारांची चिंता वाढविली आहे. अवकाळी पाऊस, प्रतिकूल आणि ढगाळ वातावरणाचा फुलोऱ्यावर किती आणि कसा परिणाम भविष्यामध्ये होणार आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
- मनोहर गुरव, बागायतदार.


इतर बातम्या
भात खरेदी दराची वाढ शेतकऱ्यांच्या...राजापूर (जि. रत्नागिरी) ः अनियमित पाऊस, अतिवृष्टी...
जनावरांचे दवाखाने सक्षम करू : स्वामीसोलापूर ः ‘‘जिल्ह्यातील पशुसंवर्धन दवाखान्याच्या...
मराठवाड्यात २२.९८ लाख हेक्‍टरवर रब्बीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदाच्या...
‘चोसाका’कडील थकीत रक्कम त्वरित द्यावीचोपडा, जि. जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर...
बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून...बुलडाणा : राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील...
परभणी जिल्ह्यात आणखी ३८.५१ कोटींची...परभणी : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
ठिबक, तुषार सिंचनाचे अनुदान वाढले ः...नांदेड : ‘‘शासनाने ठिबक तसेच तुषार सिंचनासाठी...
सालेगाव येथे सिंचनाच्या अनुशेषासाठी ॲड...कळमनुरी, जि. हिंगोली ः जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष...
लातूरमध्ये खरेदी केंद्रांवर तूर...लातूर : जिल्ह्यात हमीदराने तूर खरेदीसाठी नोंदणीला...
उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस?सध्या मध्य प्रदेशच्या मध्यभागी हवेचे कमी दाबाचे...
बँकांनी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे लिलाव...जयपूर - राजस्थानमधील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या...
दहावीपर्यंत शिक्षण असून हुकूमचंद तयार...दहावीनंतर शिक्षणाला रामराम ठोकणारे हुकूमचंद...
भारताच्या गहू अनुदान धोरणावर...भारत सरकारकडून देशांतर्गत साखर उद्योगासाठी (Sugar...
‘पोकरा’अंतर्गत ३२७ गावांसाठी १३०...औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (...
जादा दराने खतांची विक्री सात...नाशिक : रब्बी हंगामात शेतकऱ्यांची खतांना मागणी...
महिलांच्या विरोधाने दारू दुकान बंद सिंदी (रेल्वे) (जि. वर्धा) : दारूबंदी असलेल्या...
सोलापुरातील १३ साखर कारखाने ‘लाल यादी’तमाळीनगर, जि. सोलापूर ः यंदाच्या गाळप हंगामात...
जळगावात पावणेदोन लाख हेक्टरपर्यंत रब्बी...जळगाव ः जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ दरम्यान...
उजनीतील बेकायदा प्रवासी बोंटिगवर कारवाई...पुणे : उजनी जलाशयातून करमाळा तालुक्यातील एक...
दोन नगर पंचायतीच्या निवडणुकीत बुलडाणा...बुलडाणा ः जिल्ह्यात दोन नगरपंचायतींचे निकाल लागले...