Agriculture news in Marathi Presence of rain all over Satara district | Agrowon

सातारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जून 2020

नगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठात हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान तंत्रज्ञान केंद्राद्वारे स्मार्ट अन्न प्रक्रिया तंत्रज्ञानातील प्रगती या विषयावर दोन आठवड्याचे ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी ४ ते १५ जून या कालावधीत हे प्रशिक्षण होईल. या ऑनलाइन प्रशिक्षणाकरिता रजिस्ट्रेशन ऑनलाइन असून विनाशुल्क आहे.

सातारा ः जिल्ह्यात सोमवारी सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे पिके आडवी झाल्याने नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ४.२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. खरिपाच्या तोंडावर सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने पेरणीपूर्व कामांना गती येणार आहे.

जिल्ह्यात सोमवारी सकाळपासूनत ढगाळ वातावरण झाले होते. काही ठिकाणी अधुनमधून हलक्या सरी येत होत्या. त्यानंतर सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने सुरुवात केली. कऱ्हाड तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घराचे तसेच पिकांचे नुकसान झाले आहे. या तालुक्यात २४ तासांत २५.५४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. अनेक शेतात पाणी साचले आहे.

तसेच सातारा, जावळी, पाटण, खटाव, माण, महाबळेश्वर याही तालुक्यांत काही ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. माण, खटाव या दुष्काळी तालुक्यात पाऊस झाल्याने टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. कोरेगाव, फलटण, खंडाळा, वाई या तालुक्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले
असलेतरी खरिपाच्या दृष्टीने हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे. ऊस, आले लागवडीसह पेरणीपूर्व कामांना गती येणार आहे.

तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये
सातारा-११.०६, जावली-९.५३, पाटण-९.५५, कऱ्हाड- २५.५४, कोरेगाव-६.३३, खटाव-१०.२९, माण-१३.१४, फलटण-४.००, खंडाळा-१.७५, वाई-४.००, महाबळेश्वर-१३.२५


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात कोथिंबिरीच्या आवकेत वाढकोल्हापूर : बाजार समितीत या सप्ताहात कोथिंबीरीची...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची मागणी,...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागुपरात तुरीच्या दरातील तेजी कायमनागपूर ः कळमणासह विदर्भातील बहूतांश बाजार...
पुणे शहरालगतच्या रुग्णालयांमधील ८०...पुणे  : शहरालगतच्या गावांमध्ये कोरोनाबाधित...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...
शेळ्या, मेंढ्यांचे बाजार सुरु करण्याची...नगर  ः सध्या आषाढ महिना सुरु असून या...
गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी...भंडारा   : गोसेखुर्द प्रकल्प २०२३...
खासगी दूध संघांनी दुधाला २५ रुपये दर...नगर ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादन अडचणीत...
नांदेड जिल्ह्यात ९२ टक्के क्षेत्रावर...नांदेड ः यावर्षीच्या (२०२०) खरीप हंगामात नांदेड...
नगर जिल्ह्यात युरियाची टंचाई कायम नगर  ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना...
नगर जिल्ह्यात युरिया टंचाई कायमनगर ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना युरिया...
पुणे विभागात खरिपाचा सव्वासात लाख...पुणे ः जूनच्या सुरुवातील पुणे विभागातील अनेक...
आमगाव खडकी गावाने सहायता निधीला मदत देत...वर्धा  ः गावातील मार्गावरुन जाणाऱ्या...
लासलगाव बाजार समितीत आजपासून शेतमालाचे...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात...
औरंगाबादेत २४ लाख क्विंटल कापूस खरेदीऔरंगाबाद : जिल्ह्यात कापूस पणन महासंघ (सीसीआय),...
नांदेड, परभणी, हिंगोलीत हरभऱ्याची...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
गुजरातमधील अवैध एचटीबीटी उत्पादनाला...नागपूर ः बीटी नंतर एचटीबीटी (तणनाशक सहनशील)...
खाजगी दुध संघांनी दूधाला २५ रुपये दर ...नगर  ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादक...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळीकोल्हापूर : दिल्ली सरकारने शंभर युनिटपर्यंतचे वीज...
पुणे विभागात खरिपाची सात लाख ३४ हजार...पुणे   ः जूनच्या सुरूवातील पुणे...