Agriculture news in Marathi, The presence of rain in the district for two days | Agrowon

नगर : दोन दिवसांपासून जिल्हाभरात पावसाची हजेरी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी (ता. २०) सकाळी सहा वाजेपर्यंत सर्वच्या सर्व ९७ महसूल मंडळांत पाऊस झाला. काही महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली, तर अन्य पन्नास मंडळांत जोरदार पाऊस झाल्याची प्रशासनाकडे नोंद झाली आहे. या पावसामुळे अकोले तालुक्यात भातासह जिल्हाभरात काढणीला आलेल्या पिकांना फटका बसला आहे. 

नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी (ता. २०) सकाळी सहा वाजेपर्यंत सर्वच्या सर्व ९७ महसूल मंडळांत पाऊस झाला. काही महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली, तर अन्य पन्नास मंडळांत जोरदार पाऊस झाल्याची प्रशासनाकडे नोंद झाली आहे. या पावसामुळे अकोले तालुक्यात भातासह जिल्हाभरात काढणीला आलेल्या पिकांना फटका बसला आहे. 

परतीचा पाऊस गेल्यानंतर दोन दिवसांपासून नगर जिल्ह्यामध्ये पाऊस पडत आहे. शनिवारी (ता. १९) दिवसभर अनेक ठिकाणी पाऊस पडला. रविवारी अधून-मधून पावसाच्या सरी पडत होत्या. कर्जत, शेवगाव, पाथर्डी, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले भागात झालेल्या पावसामुळे कापूस, बाजरी, भाताचे नुकसान होत आहे. असे असले तरी, रब्बीतील ज्वारीसह अन्य पेरणीला वेग येण्यास मदत होणार आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (ता. २१) जिल्हाभरात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

रविवारी सहा वाजेपर्यंत झालेला पाऊस असा ः श्रीगोंदा ः २९, पेडगाव ः १७, काष्टी ः १८, चिंभळा ः २४, बेलवंडी ः ४१, दैवदैठण ः २६, मांडवगण ः ६, कोळगाव ः १६, कर्जत ः ४०, राशीन ः ६७, भांबोरा ः ५६, कोंभळी ः ३०, माही ः २४, मिरजगाव ः ३७, जामखेड - २८, खर्डा ः १७, नायगाव ः १२, अरणगाव ः १४, नान्नज ः १७, नायगाव ः १२, अरणगाव ः १४, श्रीरामपूर ः ४५, उंदिरगाव ः ३६, बेलापूर ः  ६९, टाकळीभान ः ३६, राहुरी ः ३६, वांबोरी ः १७, देवळाली प्रवरा ः ३४, ब्राह्मणी ः ४२, टाकळीमिया ः ४७, राहाता ः २८, पुणतांबा ः ४०, बाभळेश्वर ः १२, नेवासा ः ३५, सलाबतपूर ः ६०, चांदा ः ६१, कुकाणा ः ६४, बडाळा 
बहिरोबा ः ५४, घोडेगाव ः ५१, सोनई ः ४९, नालेगाव ः २४, रुईछत्तीशी ः ३६, भिंगार ः २२, वाळकी ः १५, पाथर्डी ः २५, टाकळीमानुर ः ४०, करंजी ः ३०, कोरडगाव ः ३०, शेवगाव ः ३९, बोधेगाव ः ४०, चापडगाव ः २९, भातकुडगाव ः ४६, एरंडगाव ः ३०, ढोकजळगाव ः ३७, वाडेगव्हाण ः ४३, साकूर ः ३६, कोतूळ ः ३३, साकीरवाडी ः ३६, दहिगाव बोलका ः २३, अकोले ः २६, विरगाव ः ३६.

इतर बातम्या
शिवसेनेचा दावा; सत्तास्थापनेचा पेच कायममुंबई : राज्यातील सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडे...
संपूर्ण पीक कर्ज माफ करून पीकविमा सक्षम...नाशिक  : ‘नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ९९ टक्‍क्‍...सातारा ः जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी; तसेत...
परभणी जिल्ह्यातील २० मंडळांमध्ये...परभणी ः दोन वर्षांच्या खंडानंतर परभणी जिल्ह्यात...
‘स्वाभिमानी’चे ठिय्या आंदोलन सुरू  सातारा ः जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना...
परभणी जिल्ह्यात रब्बीचे सव्वापाच टक्के...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०१९-२०) रब्बी...
पुणे ः नऊ हजार हेक्टरवरील भाजीपाल्याचे...पुणे ः गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी...
जालना : निर्यातक्षम द्राक्षांच्या...जालना : निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी...
लडाखला उभारणार सेंद्रिय शेती संशोधन...पुणे ः विविध शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनावर...
नगर जिल्ह्यामध्ये २४१ वैयक्तिक पाणी...नगर ः वीस दिवस सतत पाऊस पडल्याने पाणीपातळी वाढली...
शेतकऱ्यामुळे टळला रेल्वे अपघात ! नगर : मनमाड-दौंड रेल्वेरुळाला विळद-देहरे गावच्या...
अतिपावसाने नगरमधील शेतजमिनी चिबडल्यानगर  : अतिपावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले...
नांदेड जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवरील...नांदेड : नांदेड जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या...
वर्धा जिल्ह्यातील ६०० हेक्‍टरवरील ...वर्धा  ः जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे...
दक्षिण महाराष्ट्रातील साखर...कोल्हापूर  : दक्षिण महाराष्ट्रात पावसाने...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे उन्हाळ...नाशिक  : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
ऊसतोड कामगारांच्या रोजगारावर होणार...नगर ः गतवर्षी दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र घटले....
वऱ्हाडातील प्रकल्प तुडुंबअकोला  ः गेल्या महिन्यात सतत झालेल्या...
नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यांवर धाडीनाशिक  : देशभरात कांद्याचा साठा संपुष्टात...
साखर निर्यातीला डिसेंबरपर्यंत मुदतवाढकोल्हापूर : पावसाळी स्थितीमुळे निर्यात न होऊ...