Agriculture news in Marathi, Presence of rain in drought-hit areas of Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्याच्या दुष्काळी भागात पावसाची हजेरी 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

पुणे ः गणपतीच्या विसर्जनानंतर पुन्हा पावसाने जोर धरण्यास सुरवात केली आहे. पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागात तुरळक ठिकाणी बुधवारी (ता. १९) सायंकाळी आणि गुरुवारी सकाळीही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. जुन्नरमधील निमगाव येथे ८७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणे तुडुंब भरली असून, अकरा धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

पुणे ः गणपतीच्या विसर्जनानंतर पुन्हा पावसाने जोर धरण्यास सुरवात केली आहे. पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागात तुरळक ठिकाणी बुधवारी (ता. १९) सायंकाळी आणि गुरुवारी सकाळीही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. जुन्नरमधील निमगाव येथे ८७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणे तुडुंब भरली असून, अकरा धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

पुणे जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात चांगलाच पाऊस पडत असला तरी, पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर कमी अधिक होता. काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. जिल्ह्यात घोड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

येडगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही ३५, पिंपळगाव जोगे १८, खडकवासला १३, भाटघर १० तर पूर्वेकडील उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३४ मिलिमीटर पाऊस पडला. तर माणिकडोह, वडज, डिंभे, विसापूर, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, आंध्रा, कासारसाई, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवघर, वीर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही हलका पाऊस पडल्याने ओढे, नाले खळाळून वाहत आहे. त्यामुळे धरणेही तुडुंब भरली असून  वीर, भाटघर, उजनी, खडकवासला, घोड, भामा आसखेड या धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. 

पूर्व पट्ट्यातील उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शिरूर, इंदापूर, दौंड, बारामती, पुरंदर या तालुक्यातही पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडल्याने शेतकरी सुखावले आहेत. बारामतीतील माळेगाव ४३, पणदरे २४, लोणी भापकर, सुपा २२, इंदापुरातील भिगवण ३५, इंदापूर ५१, लोणी ३३, बावडा २८, काटी ३२, निमगाव केतकी २७, सणसर ३७, दौंडमधील रावणगाव ५३, पाटस ४४, देऊळगाव राजे ३८, केडगाव २२, पुरंदरमधील भिवंडी ५७, कुंभारवळण ३२, सासवड ३७, शिरूरमधील पाबळ ६१, कोरेगाव ४०, रांजणगाव, मलठण ३०, तळेगाव ३८, न्हावरा ३२, वडगाव रसोई २८, टाकळी २०, शिरूर ५५, खेडमधील शेळपिंपळगाव ६५, आळंदी ४३, राजगुरुनगर २४, कन्हेरसर २७ मिलिमीटर पाऊस पडला. जुन्नरमधील वडगाव आनंद ६६, बेल्हे ५२ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांनी रब्बीची तयारी सुरू केली आहे.


इतर बातम्या
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...
पुणे शहरालगतच्या रुग्णालयांमधील ८०...पुणे  : शहरालगतच्या गावांमध्ये कोरोनाबाधित...
गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी...भंडारा   : गोसेखुर्द प्रकल्प २०२३...
शण्मुख नाथन झटतोय निंब वृक्ष वाढीसाठीअकोला ः वृक्ष संवर्धन, पर्यावरणाच्या उद्देशाने...
शेळ्या, मेंढ्यांचे बाजार सुरु करण्याची...नगर  ः सध्या आषाढ महिना सुरु असून या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बंद मागे;...औरंगाबाद :  कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा...
नगर जिल्ह्यात युरियाची टंचाई कायम नगर  ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना...
नांदेड जिल्ह्यात ९२ टक्के क्षेत्रावर...नांदेड ः यावर्षीच्या (२०२०) खरीप हंगामात नांदेड...
खासगी दूध संघांनी दुधाला २५ रुपये दर...नगर ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादन अडचणीत...
देशात कृषी स्टार्टअपला वाव : संगीता...पुणे: जगात कृषी क्षेत्रातील प्रत्येक नववा...
पुणे विभागात खरिपाचा सव्वासात लाख...पुणे ः जूनच्या सुरुवातील पुणे विभागातील अनेक...
नगर जिल्ह्यात युरिया टंचाई कायमनगर ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना युरिया...
औरंगाबादेत २४ लाख क्विंटल कापूस खरेदीऔरंगाबाद : जिल्ह्यात कापूस पणन महासंघ (सीसीआय),...
लासलगाव बाजार समितीत आजपासून शेतमालाचे...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात...
आमगाव खडकी गावाने सहायता निधीला मदत देत...वर्धा  ः गावातील मार्गावरुन जाणाऱ्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे: मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान होत...
सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या राज्यात ५४...पुणे ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे...
गुजरातमधील अवैध एचटीबीटी उत्पादनाला...नागपूर ः बीटी नंतर एचटीबीटी (तणनाशक सहनशील)...
नांदेड, परभणी, हिंगोलीत हरभऱ्याची...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळीकोल्हापूर : दिल्ली सरकारने शंभर युनिटपर्यंतचे वीज...