नांदेड, परभणी, हिंगोलीत पावसाची हजेरी

नांदेड, परभणी, हिंगोलीत पावसाची हजेरी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पावसाची हजेरी

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८ तालुक्यांतील १०९ मंडळांमध्ये शुक्रवारी (ता. २६) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. रिमझिम पावसाने पिकांना जीवनदान मिळले. परंतु हलक्या जमिनीवरील पिकांसाठी मोठ्या पावसाची गरज आहे.

नांदेड जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील ५५ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. किनवट तालुक्यातील शिवणी येथे सर्वाधिक ७२ मिलिमीटर पाऊस झाला. हदगाव, किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर, अर्धापूर, उमरी आदी तालुक्यांत पावसाचा जोर अधिक राहिला. परभणी जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील २४ मंडळांमध्ये पावसाने हजेरी लावली. जिंतूर, सेलू तालुक्यात सर्वदूर हलका ते मध्यम पाऊस झाला. अन्य ६ तालुक्यांत तुरुळक ठिकाणी पाऊस झाला.

पूर्णा तालुक्यात पावसाची नोंद नाही. हिंगोली जिल्ह्यातील सर्व ५ तालुक्यांतील ३० मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. शुक्रवारी दुपारपर्यंत काही भागांत पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ, वसमत तालुक्यांत सर्वदूर पावसाची नोंद झाली. 

मंडळनिहाय पाऊस (मि.मी) 

नांदेड जिल्हा नांदेड ४, लिंबगाव ४, अर्धापूर १५, मालेगाव १२, दाभड १०, नायगाव १३, मांजरम ४, बरबडा ४, कुंटूर ६, हदगाव २१, तामसा २१, मनाठा २५, पिंपरखेड २२, आष्टी ३८ निवघा २२, तळणी २५, माहूर १२, वाई ८, वानोळा १९, सिंदखेड २७,  मुदखेड १०, बारड ७, लोहा १४, कलंबर ५, किनवट १७, इस्लापूर ३६, मांडवी १०, बोधडी १७, दहेली १३, जलधारा २५, शिवणी ७२, हिमायतनगर ४४, सरसम ४७, जवळगाव २४, भोकर २०, किनी २२, मोघाली १०, मातुल ६, उमरी १८, सिंदी ८, गोलेगाव ११, धर्माबाद १३, जारिकोट ६, करखेली २८, सगरोळी ४, आदमपूर ७. 
परभणी जिल्हा झरी ८, बोरी ११, जिंतूर १७, चारठाणा १८, बामणी १५, सावंगी म्हाळसा १६, आडगाव १०, सेलू, ७, देऊळगाव ४, कुपटा ६, वालूर ८, चिकलठाणा ७.
हिंगोली जिल्हा हिंगोली १२, खंबाळा १०, माळहिवरा १९, सिरसम २५, बासंबा ६, नरसी नामदेव ९, डिग्रस २५, कळमनुरी १९, नांदापूर २५, आखाडा बाळापूर १४, डोंगरकडा ६, वारंगा फाटा ५, वाकोडी १९, सेनगाव १२, गोरेगाव ३५, आजेगाव २५, साखरा ६, पानकनेरगाव १८, हत्ता २३, वसमत ६, हट्टा ८, गिरगाव ११, कुरुंदा २०, टेंभुर्णी ५, आंबा १२, हयातनगर ६, औंढा नागनाथ ३८, जवळा बाजार १२, येळेगाव २४,साळणा १४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com