Agriculture news in Marathi Presence of rain in Satara district | Agrowon

सातारा जिल्ह्यात पावसाची हजेरी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जून 2020

सातारा ः जिल्ह्यात रविवारी पूर्वमोसमी पावसाने चांगली हजेरी लावली. त्यापूर्वी आलेल्या वादळी वाऱ्याने सातारा शहरासह कऱ्हाड, कोरेगाव तालुक्‍यांत या पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर घरांवरील पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या.

सातारा ः जिल्ह्यात रविवारी पूर्वमोसमी पावसाने चांगली हजेरी लावली. त्यापूर्वी आलेल्या वादळी वाऱ्याने सातारा शहरासह कऱ्हाड, कोरेगाव तालुक्‍यांत या पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर घरांवरील पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या. दरम्यान, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी तातडीने या घटनेची दखल घेत प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

सातारा शहरात दुपारी एकच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. कऱ्हाड तालुक्‍याच्या विविध भागात दुपारपासून पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने कृष्णा काठावरील अनेक गावांत हजेरी लावली.

या तालुक्यातील वडगाव हवेली परिसरात दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या वादळी पावसाने घराची पडझड तसेच घरावरील छताचे पत्रे उडून गेले. घरासमोर उभा केलेल्या ट्रॅक्‍टरवर झाड पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. अचानक हजेरी लावलेल्या या वादळी
पावसाने शेतकरी वर्गाची दैना उडाली. ग्रामपंचायत तसेच तलाठी कार्यालयामार्फत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत.

रविवारी दुपारी बाराच्या सुमारास सोसाट्याचे वारे सुटून वादळी पावसाने तडाखा दिला. वाऱ्यासह गारांचा वर्षाव होऊ लागला. साधारण अर्धा तास पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरणात निर्माण झाले. ऊस, हळद, भात पिकास हा पाऊस उपयुक्त ठरला असला, तरी प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्याने व पावसाने लाखो रुपयांचे नुकसान झाले. महाबळेश्‍वर तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.

सातारा तालुक्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरात गारा व विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. वादळी वाऱ्यारहिमतपूरमधील अनेक घरांचे पत्रे उडाले. झाडांसह विजेचे खांब उन्मळून पडले. यामुळे वीज प्रवाह रात्री उशिरापर्यंत खंडित झाला होता. हा खरिपातील पेरणी पूर्व कामांना फायदेशीर उपयुक्त ठरणार आहे.सोमवारी सकाळपासून बहुतेक ठिकाणी ढगाळ वातावरण व हलका पाऊस झाला.


इतर ताज्या घडामोडी
पुणे शहरालगतच्या रुग्णालयांमधील ८०...पुणे  : शहरालगतच्या गावांमध्ये कोरोनाबाधित...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...
शेळ्या, मेंढ्यांचे बाजार सुरु करण्याची...नगर  ः सध्या आषाढ महिना सुरु असून या...
गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी...भंडारा   : गोसेखुर्द प्रकल्प २०२३...
खासगी दूध संघांनी दुधाला २५ रुपये दर...नगर ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादन अडचणीत...
नांदेड जिल्ह्यात ९२ टक्के क्षेत्रावर...नांदेड ः यावर्षीच्या (२०२०) खरीप हंगामात नांदेड...
नगर जिल्ह्यात युरियाची टंचाई कायम नगर  ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना...
नगर जिल्ह्यात युरिया टंचाई कायमनगर ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना युरिया...
पुणे विभागात खरिपाचा सव्वासात लाख...पुणे ः जूनच्या सुरुवातील पुणे विभागातील अनेक...
आमगाव खडकी गावाने सहायता निधीला मदत देत...वर्धा  ः गावातील मार्गावरुन जाणाऱ्या...
लासलगाव बाजार समितीत आजपासून शेतमालाचे...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात...
औरंगाबादेत २४ लाख क्विंटल कापूस खरेदीऔरंगाबाद : जिल्ह्यात कापूस पणन महासंघ (सीसीआय),...
नांदेड, परभणी, हिंगोलीत हरभऱ्याची...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
गुजरातमधील अवैध एचटीबीटी उत्पादनाला...नागपूर ः बीटी नंतर एचटीबीटी (तणनाशक सहनशील)...
खाजगी दुध संघांनी दूधाला २५ रुपये दर ...नगर  ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादक...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळीकोल्हापूर : दिल्ली सरकारने शंभर युनिटपर्यंतचे वीज...
पुणे विभागात खरिपाची सात लाख ३४ हजार...पुणे   ः जूनच्या सुरूवातील पुणे...
पुण्यात सर्वच भाजीपाल्याच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
अन्नधान्यासह हाताला काम मिळणे गरजेचे ः...नाशिक : आपली अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक...
तापमान वाढीची प्रक्रिया रोखण्यासाठी...ओस्लो (नॉर्वे) येथील ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल...