Agriculture news in Marathi Presence of rains in many parts of Khandesh | Agrowon

खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 जून 2021

खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पेरणीयोग्य पाऊस मात्र कुठेही झालेला नाही. 

जळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पेरणीयोग्य पाऊस मात्र कुठेही झालेला नाही. 

बुधवारी (ता. १६) सायंकाळी ढगांची जमवाजमव झाली आणि हलका पाऊस सुरू झाला. यानंतर रात्रीदेखील अधूनमधून सरी कोसळत होत्या. यामुळे वातावरणात गारवा तयार झाला, पण कुठेही पाऊस वाहून निघाला नाही. यामुळे अतिवृष्टी झाल्याची माहितीदेखील नाही. पेरण्यांसाठी किमान ४० ते ६० मिलिमीटर पावसाची आवश्यकता आहे. 

पेरणीयोग्य पाऊस खानदेशात कुठेही झालेला नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, एरंडोल, धरणगाव, पाचोरा, अमळनेर, भुसावळ, जामनेर, यावल आदी भागांत पाऊस झाला. धुळ्यात शिंदखेडा, धुळे, शिरपूर येथे पाऊस झाला. तर नंदुरबारातही 
तळोदा, शहादा, अक्कलकुवा आदी भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याची माहिती मिळाली. गुरुवारी (ता. १७) सकाळपासून पावसाळी वातावरण होते. उकाडा, ढगांची जमवाजमव, अशी  स्थिती होती. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण खानदेशात पावसाची अनेक दिवस प्रतीक्षा होती. जोरदार पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. 

कापूस व इतर कोरडवाहू पिकांची पेरणी लांबत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कोपूस, ज्वारी, सोयाबीन, तुरीची पेरणी वेळेत किंवा २० जूनपूर्वी व्हायला हवी, असा मुद्दा  शेतकरी उपस्थित करीत आहेत. पण पेरणीयोग्य पाऊस नसल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागलेले नाहीत, असे चित्र आहे. बुधवारचा पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः जळगाव २१, चोपडा १४, धरणगाव ११, एरंडोल १३. धुळे १७, शिंदखेडा ११, नंदुरबार १४.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
भारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...
मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...