Agriculture news in Marathi Presence of torrential rains in Konkan, Central Maharashtra | Page 3 ||| Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची हजेरी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 सप्टेंबर 2021

घाटमाथ्यासह सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील पुणे, नगर, नाशिक, सातारा जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने नद्यांची पाणीपातळी वाढली असून, धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे.

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. घाटमाथ्यासह सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील पुणे, नगर, नाशिक, सातारा जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने नद्यांची पाणीपातळी वाढली असून, धरणांच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे.

सोमवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरी पडल्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील गगणबावडा येथे सर्वाधिक १५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर कोकणातील बेलापूर येथे १४० मिलिमीटर, राजापूर १३०, हर्णे, मोखेडा, तसेच मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर, पेठ येथे १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

कोकण : बेलापूर १४०, राजापूर १३०, हर्णे, मोखेडा प्रत्येकी १००, दापोली, जव्हार, कल्याण प्रत्येकी ९०, खालापूर, माथेरान, पोलादपूर, वाडा प्रत्येकी ७०, अलिबाग, डहाणू, मंडणगड, पेण, संगमेश्वर देवरुख, सावंतवाडी, ठाणे, विक्रमगड प्रत्येकी ६०, अंबरनाथ, भिवंडी, दोडामार्ग, मालवण, पनवेल, शहापूर, उल्हासनगर प्रत्येकी ५०.

मध्य महाराष्ट्र : गगनबावडा १५०, महाबळेश्वर, पेठ प्रत्येकी १००, इगतपुरी, नवापूर प्रत्येकी ९०, अक्कलकुवा, भोर, लोणावळा (कृषी), सुरगाणा प्रत्येकी ७०, हर्सूल, त्र्यंबकेश्वर प्रत्येकी ६०, ओझरखेडा, राधानगरी प्रत्येकी ५०, चंदगड, शिरपूर, वेल्हे प्रत्येकी ४०, अकोले, दिंडोरी, खंडाळा बावडा, पन्हाळा, पौड मुळशी, शाहूवाडी, श्रीरामपूर प्रत्येकी ३०.

मराठवाडा : नांदेड, परांडा ४०, पूर्णा ३०, औरंगाबाद, कंधार, खुलताबाद, नायगाव खैरगाव प्रत्येकी २०.

विदर्भ: सालेकसा ८०, आमगाव ५०, धानोरा, गोंदिया, गोरेगाव, कुरखेडा, पोंभुर्णा प्रत्येकी ४०, भामरागड, चामोर्शी, गोंडपिपरी, मुलचेरा, पारशीवणी, तिरोडा प्रत्येकी ३०.


इतर अॅग्रो विशेष
मॉन्सूनोत्तर पावसाचा पिकांना दणकापुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
देशातील सोयाबीनची केवळ २७ टक्के काढणीपुणे : खरीप हंगाम २०२१-२२मध्ये सोयाबीनची लागवड...
संघर्षातून फुलले शेतीमध्ये 'नवजीवन'अवघी दोन एकर जिरायती शेती. खाण्यापुरती बाजरी...
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
विदर्भ, मराठवाड्यात उद्यापासून पावसाची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपूर्ण...
सूक्ष्म सिंचन अनुदानात वाढपुणे ः केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सिंचन...
मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघारपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
भाजपच्या जातीयवादाला धर्मनिरपेक्षवादाने...मुंबई ः या देशात भाजप जो टोकाचा जातीयवाद करतो आहे...
‘कथनी आणि करणी’त फरक पुन्हा उघडपुणे : आधीच अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या...
बाजाराचा अंदाज घेऊनच सोयाबीन विक्री करापुणे : सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात...
लातुरात सोयाबीनच्या भावात तीनशेची घसरणलातूर ः खाद्यतेल आयात शुल्क कपातीच्या निर्णयानंतर...
आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक...मुंबई : आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन...
झेंडूसह अन्य फुलांमध्ये शिरसोलीची ओळखजळगाव जिल्ह्यातील शिरसोली गाव फुलशेतीसाठी...
मॉन्सूनचा महाराष्ट्रातून निरोपपुणे : राजस्थानातून परतीच्या प्रवासाला उशिरा...
देशी केळी अन रताळ्यांना नवरात्रीसाठी...कोल्हापूर जिल्ह्यात नवरात्रीच्या निमित्ताने...
रब्बीसाठी बियाणे पुरवठादार म्हणून...अकोला ः येत्या रब्बी हंगामात राष्ट्रीय अन्न...
खाद्यतेल आयातशुल्कात मोठी कपातपुणे : काही केल्या खाद्यतेलाचे दर कमी होत नाही...
अतिवृष्टिग्रस्तांसाठी १० हजार कोटीमुंबई ः राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे...
‘सीसीआय’ करणार खुल्या बाजारातून कापूस...नागपूर ः आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा परिणामी...
प्रयत्नशील व प्रयोगशीलतेचा पडूळ...लाडसावंगी (जि.. औरंगाबाद) येथील प्रयोगशील, जिद्दी...