जॉइंट ॲग्रेस्को : संशोधन संचालकांकडून विद्यापीठाच्या कामाचे सादरीकरण

संशोधन संचालकांकडून विद्यापीठाच्या कामाचे सादरीकरण
संशोधन संचालकांकडून विद्यापीठाच्या कामाचे सादरीकरण

नगर ः राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्यातर्फे ४७ व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत (जॉइंट ॲग्रेस्को) बुधवारी दुपारच्या सत्रात राज्यातील चारही कृषी विद्यापीठाने आतापर्यंत केलेल्या कामांचा संशोधन संचालकांनी, तसेच कृषी परिषदेच्या संशोधन संचालकांनी पाच प्रमुख कामांचे सादरीकरण केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्यातर्फे ४७ वी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत (जॉइंट ॲग्रेस्को) राहुरीत सुरू आहे. यासाठी यंदा विविध पिकांचे १३ वाण, १७ यंत्रे आणि १८२ संशोधन शिफारसी सादर केल्या आहेत. जॉइंट ॲग्रेस्कोनिमित्त राहुरीला महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुमारे साडेचारशे जवळपास शास्त्रज्ञ, एकत्र आले आहेत. त्यानिमित्त राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी आतापर्यंत केलेल्या पाच प्रमुख कामांची माहिती देणारे सादरीकरण केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने १९९६ तो २००७ मध्ये ८६०३२ व फुले ६५ उसाचा वाण, १९८६ ते २००४ मध्ये फुले समर्थ, बसवंत ७८० हा कांदा वाण, १९८२ ते २००६ या काळात फुले, द्गिविजय, विकास, विजय, विक्रांत हा हरभऱ्याचा वाण, २००७ ते २०१२ या काळात जमिनीच्या मोजमापानुसार रब्बी ज्वारी फुले अनुराधा, फुले रेवती, फुले सुचित्रा, फुले वसुधा हे ज्वारीचे वाण, २००४ ते २०१३ या काळात भगवा, सुपर भगवा हे डाळिंबाचे वाण विकसित केल्याचे सांगितले.

परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने २००२ ते १८ या काळात परभणी मोती ही रब्बी व परभणी शक्ती ही खरीप ज्वारी, २००३ ला सोयाबीनमधील एमएयूव्ही ७१-१६२, ६१२, २०११, तुरीत बीडीएन ७११, बीएसएमआर ७३६ हे वाण, २०१७ मध्ये संकरीत बाजरी एएचबी १२००, १९८२ ते २०१८ एएचएच ४४ हा कापूस वाण विकसित केल्याचे सांगितले.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने १९९२-२००२ मध्ये रत्ना, हापूस हा आंबा, १०७४-२०१५ मध्ये वेंगुर्ला १-९ हा काजू, १९७१-२०१४ मध्ये कर्जत, रत्नागिरी, पनवेल, सह्याद्री हा भात, १९९०-२००६ मध्ये नारळ, १९९८-२००५ मध्ये सुगंधा, स्वाद, श्रीमंत हे जायफळाचे वाण विकसित केल्याचे सांगितले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने १९८५ मध्ये टीएवाय उडीद, १९८२ ला टीएजी १२४ भुईमूग, २००४ मध्ये पीकेव्ही क्रांती, २००६ मध्ये पीकेव्ही मिनी डाळमिल, २०१० मध्ये टॅक्‍टर चलित रुंद वरंबा व सरी काढणे, पेरणी यंत्र विकसित केल्याचे सांगितले. राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, डॉ. विलास खर्चे, डॉ. दत्तप्रसाद वासकर, डॉ. पराग हळदणकर यांनी सादरीकरण केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बांबू संशोधन प्रकल्प बांबू स्टार्टअप प्रमोशन, निवडुंग संशोधन, ड्रायगण फूड संसोधन प्रात्यक्षिक, क्विनोवा जात पीक पडताळणी, पाणलोट विकास क्षेत्र-प्रक्षेत्र, लिची लागवड आदींबाबत केलेल्या कामाची डॉ. शरद गडाख यांनी माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com