agriculture news in marathi, Presenting crores of bills in the treasury of Jalgaon | Agrowon

जळगावातील कोषागारमध्ये कोट्यवधींची बिले सादर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 एप्रिल 2019

जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेतसह कोषागार विभागात ‘मार्चअखेर'मुळे रविवारीदेखील (ता.३१) रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू होते. ऑनलाईन कामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी घरी जावून जेवण घेणेही टाळले. त्याची व्यवस्था कार्यालयातच करून घ्यावी लागली. कोषागार विभागात कोट्यवधी रुपयांची बिले मागील दोन दिवसात सादर झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेतसह कोषागार विभागात ‘मार्चअखेर'मुळे रविवारीदेखील (ता.३१) रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू होते. ऑनलाईन कामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी घरी जावून जेवण घेणेही टाळले. त्याची व्यवस्था कार्यालयातच करून घ्यावी लागली. कोषागार विभागात कोट्यवधी रुपयांची बिले मागील दोन दिवसात सादर झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागात विविध विभागांतून कामांची बिले सादर करण्यात आली. यामुळे या विभागाकडून एकाच दिवसात कोषागाराकडे तब्बल ५५ कोटींची बिले सादर झाली. त्यात सर्वाधिक सिंचन व बांधकाम, समाजकल्याण विभागाची बिले होती. आर्थिक वर्षातील अंतिम दोन दिवसांत शासनाकडून विविध खात्यांवर कोट्यवधींचे अनुदान प्राप्त झाले आहे. मार्चअखेर निधी खर्च झाल्याचे दाखविण्यासाठी हा सर्व आटापिटा सुरू होता.

जिल्हा परिषदेत प्रत्येक विभागाकडून कामांची बिले, टेंडर बिले सादर करण्यात आली. शिक्षण, आरोग्य, सिंचन, बांधकाम, आमदार निधी, खासदार निधीच्या कामांची बिले सादर करण्यात आली. त्यातील काही बिले खात्यांवर वर्गही झाली.

जिल्हा परिषदेत दोन दिवसांपासून प्रत्येक विभागात बिले तयार करणे व पडताळणी करून मंजुरीचे काम उरकले जात होते. शासनाकडून शनिवारी (ता.३०) व रविवारी विविध खात्यांचे अनुदान प्राप्त झाल्यानंतर अर्थ विभागाकडून पडताळणी करण्यात आली. ती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मान्यता घेऊन कोषागार विभागाकडे पाठविण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली.
 


इतर बातम्या
खानदेशात तिसऱ्या दिवशीही रिमझिम सुरूचजळगाव : खानदेशात मागील तीन दिवस सतत रिमझिम सुरू...
सोलापूर जिल्ह्यात भिज पाऊस, जोर नाहीचसोलापूर  ः गेल्या अनेक दिवसांपासूनच्या...
पावसाची सर्वदूर संततधार; धरणसाठ्यात वाढपुणे : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील बहुतांशी...
पुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात आज आणि उद्या पाऊस जोर धरणारपुणे :  गेल्या तीन ते चार दिवसापासून...
वऱ्हाडात पावसाची संततधार सुरूअकोला ः मागील दोन दिवसांपासून वऱ्हाडात पाऊस...
नागपूर जिल्ह्यात मोठा आणि तान्हा पोळा...नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना ८५००...औरंगाबाद :  जिल्ह्यातील ९६३ शेतकऱ्यांकडून...
मराठवाड्यात सुमारे ४७ लाख हेक्टरवर खरीपऔरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाचे सर्वसाधारण...
गाव करतेय गवतांचे संवर्धन शाश्वत प्रगतीच्या मार्गावर निघालेले...
खानदेशात तीन दिवसांपासून भिज पाऊसजळगाव  ः खानदेशात मागील तीन दिवसांपासून भिज...
अमळनेरमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढलावावडे, जि. जळगाव  : अमळनेर तालुक्यात जवळपास...
खडकवासलातून ११ हजार ७३५ क्युसेक विसर्गपुणे : खडकवासला धरणातून बुधवार (ता. १२) पासून...
सातपुड्यात मूगाच्या नुकसानीची शक्यताजळगाव  ः खानदेशात सातपुडा पर्वत भागात पाऊस...
गडचिरोलीत युरियाची कृत्रिम टंचाईगडचिरोली : जिल्ह्यात दोन महिन्यानंतर बरसलेल्या...
परभणीत बँकांचे उंबरठे झिजवून...परभणी : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंका...
मुंगळा परिसरात रानडुकरांचा धुडगूसमुंगळा जि. वाशीम ः चांगल्या पावसामुळे यंदा या...
‘रासाका’ सुरू करा, अन्यथा उपोषण’नाशिक : यंदाचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यापासून...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई...नांदेड ः प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालया...