agriculture news in marathi, Presenting the Payee Report of Akola, Buldhana District | Agrowon

अकोला, बुलडाणा जिल्ह्यांच्या पैसेवारीबद्दल नाराजी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

सोयाबीनचे उत्पादन ३० टक्केही नसताना एवढी पैसेवारी कशी निघाली हा प्रश्न अाहे. या नजरअंदाज पैसेवारीने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले अाहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मनमानी पद्धतीने काढलेल्या या पैसेवारीविरुद्ध अाम्ही अावाज उठवू.
- लखन गाडेकर, किसान सेना जिल्हाप्रमुख, बुलडाणा

अकोला : सप्टेंबरअखेर नजरअंदाज पैसेवारीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला असून, अकोला जिल्ह्यात ७३ पैसे, तर बुलडाण्यात ६१ पैसेवारी दर्शविण्यात अाली अाहे. विशेष म्हणजे बुलडाणा जिल्ह्यात या मोसमात सरासरीच्या २५ टक्के पाऊस कमी पडलेला असून, खरीप हंगाम अडचणीत अालेला अाहे. उत्पादकता घटलेली असताना पैसेवारी ६१ दाखविण्यात अाल्याचा अारोप शेतकऱ्यांनी केला असून नाराजीचा सूर उमटू लागला अाहे. अकोला जिल्ह्यातही अकोट, तेल्हारा या तालुक्यांमध्ये समाधानकारक परिस्थती नाही.

महसूल विभागाने अकोला जिल्ह्याची ९९१ गावांची पैसेवारी ७३ एवढी दर्शवित विभागीय अायुक्तांकडे अहवाल दिला अाहे. यात अकोट तालुक्याची ७१, तेल्हाराची ७२, बाळापूर ७१, पातूर ७३, मुर्तिजापूर ७२, तर अकोला तालुक्यातील १८५ गावांची सर्वाधिक ७७ पैसेवारी काढण्यात अाली अाहे.

या मोसमात अकोला जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली अाहे. मात्र दोन ते तीन मोठे खंड पडले. तसेच अकोट, तेल्हारा या तालुक्यांमधील  या भागातील प्रकल्प भरले नाही. पावसातील खंडामुळे खरीपातील पिकांची उत्पादकता कमी येत अाहे. सोयाबीन एकरी तीन क्विंटलपासून सुरू होत अाहे.

बुलडाण्यात नाराजी
या हंगामात वऱ्हाडातील बुलडाणा जिल्हा कमी पावसामुळे संकटात सापडलेला अाहे. पावसाळ्यातसुद्धा काही गावांना टँकरने पाणी पुरवावे लागले. खरीप पिकांची स्थितीही बिकट अाहे. मात्र यंत्रणांना सर्वत्र अालबेल दिसून अाले. परिणामी प्रशासनाने नजरअंदाज पैसेवारी ६१ पैसे  काढली आहे. यात बुलडाणा, चिखली, मेहकर, लोणार, मलकापूर या तालुक्यांची पैसेवारी ६३ ते ७० पैशांदरम्यान निघाली असल्याने सरासरी ६० च्या पुढे गेली. या तुलनेत देऊळगावराजाची ५६, सिंदखेडराजा ५७ , मोताळा ५८, नांदुरा ५६, खामगाव ५६, जळगाव जामोद ५५ या तालुक्यांची पैसेवारी अाली अाहे.


इतर अॅग्रो विशेष
चार आने की मुर्गी...केंद्र सरकारने मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर...
मटणाचे वाढते दर अन् शेळी-मेंढीपालन मागणी, पुरवठा आणि किंमत या बाबींच्या...
एरियल फवारणीसाठी हवी ‘सीआयबी’ची परवानगीनागपूर ः देशात एरियल (आकाशातून) फवारणीकामी...
कणेरी मठात ३० पासून राष्ट्रीय कृषी...कोल्हापूर : कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी...
शेतकरी गट, ‘एफपीओ’ची सबलीकरणाची वाट अवघडऔरंगाबाद : गटशेती सबलीकरण योजनेंतर्गत निवडलेल्या...
‘स्मार्ट’ची तयारी पूर्ण; दिल्लीत होणार...पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण...
कृषी विज्ञान केंद्राच्या तंत्रज्ञान...सोलापूर ः ‘‘सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राच्या...
देशात यंदा कडधान्य आयात ४६ टक्के वाढलीनवी दिल्ली: देशात यंदा कडधान्य उत्पादन...
थंडी गायब; किमान तापमानात वाढ पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...
हिंगणघाट झाले कापूस व्यवहाराचे ‘हब’कापूस प्रक्रिया उद्योगाचे जाळे विस्तारले गेल्याने...
तंत्रशुद्ध व्यवस्थापनातून मधमाशीपालनात...नाशिक शहराजवळील पाथर्डी येथील गौतम डेमसे या...
पाणीवाटपावर चर्चा गरजेची : डॉ. माधवराव...अकोला  ः देशाचा विकास होताना नागरीकरणाच्या...
चिंता पुरे; हवी थेट कृती ग्रामीण कुटुंबाचे उत्पन्न वाढल्याशिवाय देशाचा...
खेड शिवापुरात केली स्ट्रॉबेरी लागवड...खेड शिवापूर (जि. पुणे) येथील मयूर कोंडे या...
राज्यात गारठा झाला कमी पुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
थकीत कर्जावर व्याज आकारू नये : राज्य...मुंबई ः महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी...
केंद्र कांदा निर्यातबंदी, साठा मर्यादा...नवी दिल्ली ः देशात कांद्याचे उत्पादन...
शेतकरी कंपनीमुळे तयार झाले उत्पन्नाचे...पुणे जिल्ह्यातील मढ पारगाव आणि परिसरातील सात...
निर्यातदार व्हा... पण शेतकऱ्यांचा...पुणे: शेतमालाची निर्यात आता पूर्णतः ‘बिझनेस...
हरितक्रांती घडविताना सुपीकता हरवली:...अकोला : अन्नधान्य निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण...