कामवाटपांचे अधिकार अध्यक्षांना नको

यंदा सर्वांना कामांचे समान वाटप व्हायला हवे. गेल्या वर्षी सभापतींनी सेस फंड आपापसात वाटून घेतले होते. त्यामुळे कोणालाही अधिकार न देता कामांचे समान वाटप व्हावे, अशी मागणी सर्वसाधारण सभेत करणार आहोत. - पल्लवी सावकारे, सदस्य, (भाजप) जिल्हा परिषद काम वाटपासंदर्भात ५० लाखांवरील अधिकार सभेला आहेत. कामांच्या याद्या सभेत ठेवून पारदर्शकता दर्शवावी. गेल्या वर्षी काम वाटपासंदर्भात सर्वांचीच नाराजी होती. यामुळे अध्यक्षांना या वर्षी अधिकार देण्याचा प्रश्‍न उरत नाही. - नानाभाऊ महाजन, सदस्य, (शिवसेना) जिल्हा परिषद
कामवाटपांचे अधिकार अध्यक्षांना नको
कामवाटपांचे अधिकार अध्यक्षांना नको

जळगाव : जिल्हा परिषदेच्या विविध योजनांसंदर्भातील कामांचे नियोजन करण्यासंदर्भातील सर्व अधिकार अध्यक्षांना देण्यास विरोधकांसह सत्ताधारी गटातील सदस्यदेखील इच्छुक नसल्याचे चित्र आहे. याबाबत अद्याप काही स्पष्ट झाले नसले, तरी २५ जुलैला होणाऱ्या विशेष सभेत याबाबतचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. या सभेबाबत मंगळवारी (ता. १७) जिल्हा परिषदेत प्रशासन व पदाधिकारी यांना आढावा घेतला.

जिल्हा परिषदेच्या विभागांमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांसाठी निधी प्राप्त होत असतो. शिवाय, स्वनिधीतूनही तरतूद केली जाते. मागील वर्षी निधी खर्च करण्यासाठी कामांचे नियोजन नऊ महिने उशिराने झाले होते. त्यामुळे कामवाटप लवकर होण्याच्या दृष्टीने विशेष सभा घेऊन सर्व अधिकार अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांना देण्यात आले होते. त्यानंतर कमी कामे मिळाल्यामुळे विरोधकांबरोबरच सत्ताधारी गटातील सदस्य नाराज होते. यंदा कामवाटप करण्यासंदर्भातील अधिकार अध्यक्षांना न देण्याबाबतच्या हालचाली सुरू आहेत.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गेल्या महिन्यात झाली. परंतु आचारसंहिता असल्याने कोणतेही महत्त्वाचे निर्णय किंवा कामांना मंजुरी देण्यात आलेली नव्हती. यामुळे आता विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे. ती २५ जुलैला छत्रपती शाहू महाराज सभागृहात होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com