agriculture news in marathi, president of india visit to seva gram, vardha, maharashtra | Agrowon

राष्ट्रपतींनी घेतला सूतकताईचा अनुभव

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑगस्ट 2019

वर्धा  ः राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमातील आदिनिवास, बापूकुटी, महादेव देसाई कुटीची पाहणी करून अंबर चरख्यावर सूतकताईचा अनुभव घेतला. 

वर्धा  ः राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमातील आदिनिवास, बापूकुटी, महादेव देसाई कुटीची पाहणी करून अंबर चरख्यावर सूतकताईचा अनुभव घेतला. 

सेवाग्राम मेडिकल कॉलेजच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद शनिवारी (ता. १७) वर्धा येथे आले होते. त्यांच्या समवेत श्रीमती सविता रामनाथ कोविंद, राष्ट्रपती यांच्या कन्या स्वाती, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्‍त संजीव कुमार, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी. आर. प्रभू उपस्थित होते. 

आश्रमात उभारण्यात आलेल्या सर्वांत पहिल्या कुटीची म्हणजेच आदिनिवासची माहिती राष्ट्रपतींनी घेतली. महात्मा गांधीच्या येथील वास्तव्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. कापूस ते कापड प्रकल्पाची येथील महिला विणकरांकडून माहिती घेतली. या वेळी त्यांनी पत्नी, मुलगी आणि मुलासाठी ९ मीटर खादीचे कापडसुद्धा खरेदी केले. तसेच आश्रमात चंदन वृक्षांची लागवड करून त्यांनी तब्बल पाऊण तास आश्रमात घालवला. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाश विभागाने प्रकाशित केलेल्या महात्मा गांधी लाईफ थ्रू लेन्सेस हे इंग्रजी आणि महात्मा गांधी चित्रमय जीवन गाथा हे गांधीजींच्या दुर्मिळ छायाचित्रांवर आधारित हिंदीतील कॉफीटेबल बुक सेवाग्राम आश्रमाला राष्ट्रपतींनी भेट दिले.


इतर ताज्या घडामोडी
कथित अफवेचा टोमॅटो रोपांच्या मागणीवर...कोल्हापूर: कोरोनापेक्षा घातक व्हायरस टोमॅटोवर...
अकोला जिल्ह्यात आता दिवसाला हजार...अकोला  ः जिल्ह्यात कापूस खरेदी प्रक्रिया...
जळगावात एक क्विंटल कापसामागे चार किलोची...जळगाव : एक क्विंटल कापसामागे चार किलो कापसाची...
‘कोरोना’विरुद्धच्या लढाईसाठी माजी...अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
अकोला झेडपी शेतकऱ्यांना अनुदानावर देणार...अकोला  ः यंदा विविध संकटांमुळे हवालदिल...
नगर जिल्ह्यात ७१ हजार ६६५ क्विंटल तूर...नगर  ः नगर जिल्ह्यात नाफेडने सुरु केलेल्या...
खानदेशात गोदामांअभावी मका खरेदीला विलंब...जळगाव  ः खानदेशात मक्‍याच्या शासकीय...
औरंगाबादमध्ये १६७५ टन खते, ६० क्विंटल...औरंगाबाद : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर...
शासन करणार ५० हजार टन युरियाचा बफर... नगर  : राज्यात खरीप हंगामाची तयारी...
वाघूर नदीकाठी पाटचारीत आवर्तन सोडा,...जळगाव  ः वाघूर नदीकाठी व शिवारातील टंचाई...
औरंगाबाद जिल्हयात मागणीनुसार ८ हजारावर...औरंगाबाद : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार...
बुलडाण्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन... बुलडाणा   ः जिल्ह्यातील...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
लातूरमधील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयास...परभणी : लातूर येथील विलासराव देशमुख कृषी...
‘केव्हिकें’नी मधमाशीपालनातील उद्योजक...परभणी : ‘‘मराठवाड्यातील सर्व कृषी विज्ञान...
नगर जिल्ह्यात गतवर्षीच्या शिल्लक...नगर  ः नगर जिल्ह्याला खरिपासाठी २ लाख ९१...
शिधापत्रिका नसणाऱ्यांना दोन महिन्यांचे...पुणे : अन्न व नागरी पुरवठा विभागाच्‍या...
नाशिक जिल्ह्यात 'मूठभर कापूस जाळा'...नाशिक : खरीप पेरणीचा हंगाम तोंडावर येऊनही...
बुलडाण्यात २६ हजार ७४८ शेतकऱ्यांकडे...बुलडाणा  ः यंदा असंख्य अडचणींना सामोरा जात...
पुणे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांत...पुणे  : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ८२ गावांत...