कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

नवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी (ता.२७) मंजुरी दिली. यामुळे या विधेयकांचे आता कायद्यांत रुपांतर झाले आहे.
कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी
कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

नवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी (ता.२७) मंजुरी दिली. यामुळे या विधेयकांचे आता कायद्यांत रुपांतर झाले आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने कृषी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य, कृषी सेवा आणि हमी भाव करार आणि जीवनावश्‍यक वस्तू दुरुस्ती अशी तीन कृषीविषयक विधेयके संसदेसमोर मांडली होती. प्रचंड गदारोळात ही तिन्ही विधेयके मंजूरही करण्यात आली. या विधेयकांना अनेक शेतकऱ्यांचा आणि काही राजकीय पक्षांचा विरोध आहे. याच मुद्यावरुन भाजपचा अनेक वर्षांचा मित्र पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने सरकारमधून बाहेर पडण्याचाही निर्णय घेतला. पंजाबमध्ये सध्या सरकारविरोधात आंदोलनही सुरु आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विधेयकांवर शिक्कामोर्तब झाले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com