केंद्र सरकार शेतीत गुंतवणूक वाढविणारः राष्ट्रपती रामनाथ कोविंद

रामनाथ कोविंद
रामनाथ कोविंद

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार दुसऱ्या पर्वात अधिक आर्थिक सुधारणा, उद्योजकांना सुलभ कर्जे, जीएसटीत सुलभता आणणे तसेच शेती क्षेत्रात अधिक गुंतवणूक करणार आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात म्हणाले. संसदेत निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदार आणि लोकसभा अध्यक्षांचा शपथविधी झाल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे दोन्ही सभागृहांतील सदस्यांसमोर अभिभाषण झाले. या भाषणात राष्ट्रपती कोविंद यांनी गेल्या पाच वर्षांत सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेतला, तसेच भविष्यातील योजनांचा आराखडाही सादर केला.  ते म्हणाले, की भारताला निर्मिती हब बनविण्यासाठी सरकार लवकरच औद्योगिक धोरण आणणार आहे. देशातील जगातील पहिल्या ‘इज ऑफ डूईंग बिझनेस’ देशांच्या यादीत येण्यासाठी सरकार कायद्यांमध्ये सुलभता आणणार आहे. भारत सध्या जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था आहे. महागाई कमी, वित्तीय तूट आवाक्यात आहे, विदेशी चलन गंगाजळी वाढतच आहे. विकास दराच्या बाबतीत भारत जगातील पाचवा सर्वात मोठा देश बनण्याच्या मार्गावर आहे. देशात उच्च विकास दराची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. २०१४ पर्यंत देशाला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होणार आहे. देशात अनेक भागांत सरासरीपेक्षाही कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषीवरील संकट दूर करण्यासाठी रोजगारनिर्मिती करण्यात येणार आहे.  ‘‘ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत असल्यावरच राष्ट्रीय आर्थिक स्थिती मजबूत होते. शेतकरी हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आहेत. कृषी विकासासाठी आवश्‍यक तेवढे आर्थिक साह्य राज्यांना करण्यात आले आहे. शेती क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी येणाऱ्या काळात २५ हजार कोटी रुपये देणार आहेत. शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजनाही मान्य करण्यात आली होती. तसेच पशुधाची काळजी आणि १० हजार नवीन सहकारी संस्थानिर्मिती करण्यात येणार आहे,’’ असेही राष्ट्रपती कोविंद म्हणाले.  राष्ट्रपतींच्या भाषणातील ठळक मुद्दे

  • जलसंवर्धनासाठी जलशक्ती मंत्रालय हे एक निर्णायक पाऊल 
  • छोटे व्यापारी शेतकऱ्यांना पेन्शन योजना
  • २६ लाख गरिबांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ 
  • सर्वाधिक स्टार्टअप असलेल्या देशांपैकी एक भारत 
  • कृषी क्षेत्रात २५ लाख कोटींची गुंतवणूक करणार 
  •   जिल्हा पातळीवर ‘खेलो इंडिया’ योजना राबवून ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन देणार
  • २०२४ पर्यंत उच्च शिक्षणातील जागा ५० टक्के वाढवणार 
  • २०२४ पर्यंत अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरवर जाणार
  • दहशतवादाच्या मुद्द्यावर संपूर्ण जग भारता सोबत 
  • सरकारचा वाहतूक व्यवस्थेच्या विकासावर भर 
  • कावेरी, गंगा, महानदी, नर्मदा, पेरियार, गोदावरी या नद्यांना प्रदूषणमुक्त करणार
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com