agriculture news in marathi, press conferance of giridhar patil, nashik, maharashtra | Agrowon

शेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार कर्दनकाळ ठरला ः डॉ. गिरधर पाटील
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 एप्रिल 2019

नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात अनेक प्रकारचे गुणात्मक फरक दाखवता येतील. शेतकरी व शेतीच्या दृष्टीने गेल्या पाच वर्षांतील सरकारचा कारभार कर्दनकाळ ठरला असून, शेती व शेतकऱ्यांच्या अस्तित्वालाच धोका असल्याचे जाणवू लागले असल्याची टीका शेतकरी नेते अभ्यासक डॉ. गिरधर पाटील यांनी केली.

नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात अनेक प्रकारचे गुणात्मक फरक दाखवता येतील. शेतकरी व शेतीच्या दृष्टीने गेल्या पाच वर्षांतील सरकारचा कारभार कर्दनकाळ ठरला असून, शेती व शेतकऱ्यांच्या अस्तित्वालाच धोका असल्याचे जाणवू लागले असल्याची टीका शेतकरी नेते अभ्यासक डॉ. गिरधर पाटील यांनी केली.

मंगळवारी (ता. २३) आयोजित पत्रकार परिषेदत डॉ. पाटील बोलत होते. या वेळी ते म्हणाले, की शेती, रोजगार व व्यापार यांना रसातळाला नेणारी नोटाबंदी व सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारा जीएसटी, असे झटक्यात तुघलकी निर्णय घेणारे हे सरकार कुठल्याही परिस्थितीत सत्तेवर येता कामा नये. ही निवडणूक कोणाला जिंकणवण्यासाठी नसून, आपल्या जिवावर उठलेल्या राक्षसापासून आपले संरक्षण करण्यासाठीची आहे.

नाशिकमध्ये तीन प्रमुख उमेदवारांपैकी एक उमेदवार अधिकृत युतीचा आहे व दुसरा भाजपचा बंडखोर अपक्ष उमेदवार आहे. हे दोघे ही शेतकरी विरोधी धोरणांचे पुरस्कर्ते असल्याने शेतकऱ्यांनी त्यांचा विचार करण्याचे काही एक कारण नाही. राहिलेल्या उमेदवाराला निवडून दिले तर शेतीत काय करायचे याचा किमान विचार तरी करता येईल; पण शेतकरी विरोधी पक्षांना मत दिले तर पुढील पिढी आपल्याला कदापिही माफ करणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. या वेळी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. या वेळी शेतकरी प्रतिनिधी शिवाजी खैरनार, दिलीप कुवर उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...