agriculture news in Marathi pressure on agricultural officers for insurance companies Maharashtra | Agrowon

कृषी कर्मचाऱ्यांवर दबाव कुणासाठी?

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

पुणे : राज्याच्या कृषी विभागाकडून गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले विमा कंपन्यांचे लांगूनचालन आता कर्मचाऱ्यांनाही त्रासदायक ठरले आहे. ‘विमा कंपन्यांची कामे दबाव आणून करून घेतली जात आहेत,’ अशी तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे.

पुणे : राज्याच्या कृषी विभागाकडून गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले विमा कंपन्यांचे लांगूनचालन आता कर्मचाऱ्यांनाही त्रासदायक ठरले आहे. ‘विमा कंपन्यांची कामे दबाव आणून करून घेतली जात आहेत,’ अशी तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे.

‘पीकविम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये रोष असून, यातील अडचणी आयुक्तांनी सोडव्यात, अन्यथा भविष्यात उद्भवणारे परिणाम पाहून आम्ही कोणतेही काम करणार नाही,’ असा इशारा राज्यातील क्षेत्रिय कर्मचारी वर्गाने दिला आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या पीकविमा योजनेत अनेक घोळ घालून कंपन्यांची हुजरेगिरी करणाऱ्या काही अधिकाऱ्यांची चर्चा गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहेच; मात्र, वरिष्ठ पातळीवरून या गोंधळाला अभय मिळते. त्यामुळे विमा कंपन्यांसाठी सुरू असलेली हुजरेगिरी थांबलेली नाही. त्याचा फटका आता कृषी विभागाच्याच कर्मचाऱ्यांना बसतो आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने कृषी आयुक्त सुहास दिवसे यांना लेखी स्वरूपात पीकविम्याच्या पंचनाम्यात होत असलेला गोंधळ कळविला आहे. ‘शासनाच्या आदेशानुसार पंचनाम्याच्या याद्या तात्काळ करून नुकसान भरपाई वेळीच मिळवून देण्याचे काम आमचे असताना विमा कंपन्यांचे काम आमच्याकडून करून घेण्यासाठी वरिष्ठांकडून दबाव टाकण्यात येत आहे. हे निश्चितपणे गैर आहे,’ असे संघटनेने म्हटले आहे.

विमा हप्ता भरला जात असताना त्याच क्षेत्रामध्ये दरम्यानच्या कालावधीत दुसरे पीक घेतल्याची उदाहरणे समोर आली. त्यामुळे पंचनामा करताना वेगळे पीक निदर्शनास येते व विमा दुसऱ्या पिकाचा भरल्याचे दिसते. नुकसान झाल्यानंतर ४८ तासात कंपनीकडे शेतकऱ्यांनी कळविले. मात्र, विमा कंपन्यांचे प्रतिनिधी वेळेत शेतकऱ्यांपर्यंत गेलेले नाहीत. त्यानंतर शेतकऱ्यांनी पीक काढणी केली, असे संघटनेचे म्हणणे आहे.

या परिस्थितीत काय निर्णय घ्यायचा हा अधिकार कंपनीचा आहे. त्यामुळे आम्हाला दबावाने व अधिकार नसतानाही सदर कामे करण्यास भाग पाडू नये. त्यामुळे शेतकऱ्यांचा सध्या असलेला रोष विनाकारण कर्मचाऱ्यांवरही ओढावू शकतो. पंचनाम्यानुसार वेळीच भरपाई मिळवून देण्याचे काम सुरू आहे. पण, विमा कंपनीच्या अनुषंगाने अडचणी बघता कोणतेही काम कृषी सहायक करणार नाहीत, असे आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

कर्मचारी काय म्हणतात 

  • राज्यात पीक पंचनामे करण्याचे काम एक नोव्हेंबरपासून सुरू होते.
  • पंचनाम्यासाठी मात्र शेतकरी याद्या विमा कंपन्यांनी दोन आठवडे उशिरा दिल्या.
  • जबाबदारी असूनही विमा कंपन्यांचे प्रतिनिधी पंचनाम्याकडे फिरकले नाहीत.
  • विमा कंपन्यांऐवजी काहीच संबंध नसलेल्या कृषी सहायकांना त्रास दिला गेला.

इतर अॅग्रो विशेष
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...
द्राक्षाचे ४० वाण आयात करणार : डॉ. ए....पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
सुटीच्या दिवशीही बाजार समित्या सुरू ठेवापुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या...
विदर्भापाठोपाठ खानदेशात थंडी वाढतेयपुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे...
पणन महासंघाकडून ९ कोटी रुपयांचे चुकारेअमरावती ः राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...
नुकसानग्रस्तांना ५,३०० कोटींचा दुसरा...मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा...
साहेब, शेतीसाठी दिवसा वीज द्या हो...अकोला  ः रब्बी हंगामात सिंचनाचे काम सुरू...
नोकरीला शेतीची जोड देत उंचावले अर्थकारणआसोदे (ता. जि. जळगाव) येथील नीलेश नारायण माळी एका...
प्रक्रिया उद्योगातून सोयाबीनचे...शहरी बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड...
शेवतींच्या फुलांनी जिंकले मन !...मांजरी, पुणे : विविधरंगी शेवंतीच्या फुलांनी...
कमी पाण्यामध्ये सीताफळाचे किफायतशीर...सिंचनासाठी पाण्याच्या कमतरतेसह प्रतिकूल...
दर्जेदार वांगी उत्पादनात मानेंचा हातखंडाकसबे डिग्रज (ता. मिरज, जि. सांगली) येथील युवा...
देशी कपाशीतील संशोधनाची शंभरीपरभणी येथील कापूस संशोधन केंद्र, मेहबूब बागची...
जैवविविधता संवर्धनासाठी सामूहिक...नाशिक: पर्यावरणाची योग्य ती काळजी न घेतल्याने...
देशी कापसाचा ब्रॅंड आवश्‍यकपरभणी ः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लांब धाग्याच्या...
...'या' बॅंकांचे थकले चौदा हजार कोटी...पुणे : कोरड्या दुष्काळानंतर ओला दुष्काळ आणि त्यात...
तागाच्या पिशव्यांकडे साखर कारखान्यांची...कोल्हापूर : ताग उत्पादकांना चालना देण्यासाठी...