agriculture news in marathi pressure on banana prices began to increase in Khandesh | Agrowon

खानदेशात केळी दरांवर दबाव वाढण्यास सुरुवात

ॲग्रोवन वृत्तसेवा
रविवार, 4 एप्रिल 2021

देशातील विविध भागांत टाळेबंदी, कोरोनासंबंधीचे निर्बंध लागू केले जात असल्याने खानदेशात केळी दरांवर दबाव वाढत आहे. विशेषतः कमी दर्जाच्या केळीचे दर गेल्या दोन दिवसांत क्विंटलमागे १०० ते १२५ रुपयांनी कमी झाले आहेत.

जळगाव : देशातील विविध भागांत टाळेबंदी, कोरोनासंबंधीचे निर्बंध लागू केले जात असल्याने खानदेशात केळी दरांवर दबाव वाढत आहे. विशेषतः कमी दर्जाच्या केळीचे दर गेल्या दोन दिवसांत क्विंटलमागे १०० ते १२५ रुपयांनी कमी झाले आहेत. परंतु ज्या भागात दर्जेदार केळी आहे, त्या भागात केळीची परदेशात निर्यात काही कंपन्या करीत आहेत. 

रावेर येथून सध्या आठ कंटेनर (एक कंटनेर २० टन क्षमता) केळीची निर्यात केली जात आहे, तर खानदेशातून रोज ११ कंटेनर निर्यात परदेशात सुरू आहे. ही निर्यात आखातात अधिक होत आहे. परंतु कमी दर्जाच्या केळीची पाठवणूक खानदेशातून छत्तीसगड, नागपूर, राजस्थान, कल्याण, ठाणे, पुणे, नवी मुंबई, उत्तर प्रदेशासह इतर भागांत केली जाते. या केळीची खरेदी गेल्या दोन दिवसांपासून कमी दरात म्हणजेच ७५० ते ८५० रुपये प्रतिक्विंटल या दरात केली जात आहे. 

मध्यंतरी केळीचे किमान दर ९०० रुपये ते ९२५ रुपये,असे होते. या केळीलाही उठाव होता. कारण टाळेबंदी कुठेही नव्हती. पण गेल्या दोन दिवसांत मध्य प्रदेशातील चार जिल्हे पूर्णतः लॉकडाउन केले आहेत. छत्तीसगड, नागपुरातही कडक निर्बध आहेत. शिवाय पुण्यातही प्रतिटाळेबंदी सुरू आहे. यामुळे केळीची मागणी कमी झाली आहे. परिणामी, किमान दरांवर दबाव वाढला आहे. 

राज्यातही येत्या काही दिवसांत कोरोनाबाबत निर्बंध लागू केले जातील, असे संकेत शासनाने दिले आहेत. यामुळे राज्यातील मागणीवरही पुढे परिणाम होऊ शकतो. तसेच कोरोना निर्बंधांचे कारण सांगून पुढे कमी दरात केळी खरेदीचे प्रकारही सुरू होऊ शकतात, असे सांगितले जात आहे.

  केळी काढणी जोमात...
सध्या खानदेशात नंदुरबारमधील अक्कलकुवा, तळोदा, शहादा, जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर या भागांत केळीची अधिक काढणी सुरू आहे. प्रतिदिन २२० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची आवक सुरू आहे. यात ७० टक्के केळी उत्तम दर्जाची असते. तर उर्वरित केळी कमी दर्जाची असते.


इतर अॅग्रो विशेष
कांदाकोंडी टाळणेच योग्य पुणेः कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यात...
मंत्री साहेब, कोटींच नुकसान होईल हो ! नाशिक: जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी...
साखर निर्यातीचा यंदा विक्रम? कोल्हापूर: साखर निर्यातीची गती पाहता यंदा...
अन्न प्रक्रियेमध्ये अवरक्त किरणांचा वापरअन्न प्रक्रियेदरम्यान पारंपरिक उष्णतेच्या...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी...
महिनाभरातच गाईच्या दूधदरात ८ रुपये कपात नगर ः कोरोना लॉकडाउनमुळे दुधाची मागणी कमी...
काबुली हरभऱ्याच्या दरात घसरणीची शक्यता...नवी दिल्ली ः देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन...
ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा :...पुणे ः कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप...
पीकविम्यासाठी राज्यात बीड मॉडेल ः ...अमरावती : प्रशासकीय खर्च आणि दहा टक्के नफा अशी...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
एक लाख हेक्टरवर फळबागांचे उद्दिष्ट पुणे ः कोविड १९ च्या साथीची स्थिती राज्यभर असली...
‘महाडीबीटी’त आता बियाण्यांचाही समावेश पुणे : राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलमध्ये आता...
पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार पुणे ः मध्य प्रदेशचा आग्नेय भाग आणि परिसरात ते...
तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पुणे : राज्यातील काही भागांत पूर्वमोसमी पावसाचा...
हापूसच्या ४० हजार पेट्या थेट...रत्नागिरी ः उत्पादक शेतकरी ते थेट ग्राहक ही साखळी...
कडधान्य उत्पादनात ६५ टक्के वाढ पुणे ः देशातील कडधान्य उत्पादनात २००७-०८ पासून...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
विदर्भात पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणच्या काही...