नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
बाजारभाव बातम्या
खानदेशात केळी दरांवर दबाव
जळगाव ः खानदेशात केळी दरांवर दबाव कायम आहे. सध्या ४०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर केळीला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर, मुक्ताईनगर या भागात काढणी अधिकची सुरू आहे.
जळगाव ः खानदेशात केळी दरांवर दबाव कायम आहे. सध्या ४०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर केळीला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर, मुक्ताईनगर या भागात काढणी अधिकची सुरू आहे.
केळी दर लॉकडाऊनमध्येही कमी होते. त्या वेळेस किमान दर १५० रुपयांपर्यंत खाली आले होते. तर, निर्यातीच्या केळीलाही कमाल ८०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळत होते. सध्या दरात फारशी पडझड दिसत नसली तरी फारशी सुधारणादेखील नाही. रावेरातील केळी निर्यात सध्या बंद आहे. निर्यातक्षम केळी कमी झाली आहे. परदेशात मागणी चांगली आहे. परंतु निर्यात कमी, अशी स्थिती आहे. जळगावपाठोपाठ नंदुरबारमधील अक्कलकुवा व तळोदा भागातही केळीची काढणी सुरू आहे. तेथेही दर कमाल ६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतच आहेत.
खानदेशात सध्या रोज मिळून २०० ते २१० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची आवक किंवा पुरवठा बाजारात सुरू आहे. सर्वाधिक पुरवठा जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल व मुक्ताईनगर भागात होत आहे. या भागात रोज किमान १८० ट्रकपेक्षा अधिक केळीची आवक सुरू आहे. केळीची आवक चांगली आहे. परंतु, उत्तर भारतातील मागणी कमी आहे. रमजान महिन्यात दरात सुधारणा झाली होती.
रमजान महिना संपल्यानंतर उत्तरेकडील मागणीदेखील कमी झाली आहे. उत्तर भारतात सध्या गुजरात व मध्य प्रदेशातूनदेखील केळीची पाठवणूक सुरू आहे. यामुळे स्पर्धा वाढली असून, खानदेशातील केळीसंबंधीचा उत्तर भारतातील पुरवठा कमी झाल्याची माहिती जाणकारांनी दिली. रावेरातील केऱ्हाळे, निंबोल, ऐनपूर, रसलपूर, वाघोदा आदी भागात केळीची काढणी अधिक होत आहे.