Agriculture news in marathi Pressure on fodder rates in Khandesh | Agrowon

खानदेशात कडब्याच्या दरांवर दबाव

टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 एप्रिल 2020

जळगाव : खानदेशातून परराज्यासह इतर जिल्ह्यांत कडबा वाहतूक फारशी वेगात किंवा सुरळीत नाही. त्यामुळे कडबा दरांवर दबाव वाढला आहे. यंदा चाराही मुबलक आहे. मात्र, वाहतुकीला फारसा वेग आला नसल्याची स्थिती आहे. 

जळगाव : खानदेशातून परराज्यासह इतर जिल्ह्यांत कडबा वाहतूक फारशी वेगात किंवा सुरळीत नाही. त्यामुळे कडबा दरांवर दबाव वाढला आहे. यंदा चाराही मुबलक आहे. मात्र, वाहतुकीला फारसा वेग आला नसल्याची स्थिती आहे. 

खानदेशात चारा पिके अधिक आहेत. त्यात दादर, बाजरी, संकरित ज्वारी, हरभरा, मका या पिकांपासून चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. या पिकांची पेरणी अपेक्षेपेक्षा अधिक झाली होती. खानदेशात १३० टक्के क्षेत्रात रब्बीची पेरणी झाली होती. जळगाव जिल्ह्यात, तर ही पेरणी १५० टक्‍क्‍यांवर झाली. परिणामी, चारा पुरेसा आहे. 

जळगाव जिल्ह्यातील चाऱ्याला औरंगाबाद, बुलडाणा, जालना, नगर, मध्य प्रदेश, गुजरात भागात उठाव असतो. मागील हंगामात दुष्काळी स्थितीमुळे दादरचा चारा प्रतिशेकडा पाच हजार रुपये, मक्‍याचा चारा २५०० ते २८०० रुपये आणि बाजरीचा चाराही १५०० रुपये प्रतिशेकडापर्यंत विक्री झाला होता. चाऱ्याला सर्वत्र मागणी होती. जळगावमधून धुळे, मध्य प्रदेशातील खरगोन, बडवानी, सेंधवा, इंदूर भागातही चाऱ्याची विक्री झाली. बुलडाणा, औरंगाबाद, जालना भागातील दूध उत्पादकांनीदेखील चाऱ्याची मोठी खरेदी केली होती. 

धुळे जिल्ह्यात दूध उत्पादन अधिक आहेत. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही जळगाव, नाशिक भागातून चाऱ्याची खरेदी केली होती. यंदा आंतरराज्यीय, आंतरजिल्हा स्तरावरील वाहतूक फारशी सुकर नाही. तपासणी, परवाने असे प्रकार आहेत. मालवाहू वाहनधारकांना इंधनही मिळविताना मनःस्ताप होत आहे. मजूर पुरेसे नाहीत. 

चाऱ्याची वाहतूकीस, खरेदी-विक्रीस प्रोत्साहन द्या 

दादरची कापणी, मळणी अनेक भागात झाली आहे. तर, संकरित ज्वारीची कापणी सुरू आहे. पुढील आठवड्यात मक्‍याची कापणी, मळणी सुरू होईल. लागलीच बाजरीचा हंगाम आटोपणार आहे. यामुळे अगदी जूनपर्यंत चाऱ्याची उपलब्धता होत राहील. या स्थितीत चाऱ्याची वाहतूक, खरेदी-विक्री सुकर होण्यासाठी प्रशासनाने प्रोत्साहन द्यावे, अशी ध उत्पादक, चारा उत्पादकांची मागणी आहे. 
 

 
 


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...