agriculture news in marathi Pressure on onion prices in Khandesh | Agrowon

खानदेशात कांद्याच्या दरावर दबाव

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 19 मार्च 2021

जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या आवकेत वाढ होत आहे. लाल कांद्याची आवक या आठवड्यात धुळे, साक्री, जळगाव येथील बाजारात वाढली आहे.

जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या आवकेत वाढ होत आहे. लाल कांद्याची आवक या आठवड्यात धुळे, साक्री, जळगाव येथील बाजारात वाढली आहे. परिणामी दरावरील दबावही अधिक झाल्याची स्थिती असून, किमान दर ७०० व कमाल दर १४०० रुपये प्रतिक्विंटल एवढा आहे. 

कांदा दरात गेल्या २० ते २२ दिवसात क्विंटलमागे किमान ११ हजार रुपयांची घसरण झाली आहे. लाल कांद्याचे दर गेल्या महिन्याच्या मध्यात किमान ८०० व कमाल २२०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर होते. कांद्याला उठावही बऱ्यापैकी होता. कारण  कोरोनाची समस्या कमी होती. लग्नसराई वेगात सुरू होती. परंतु कांद्याची आवक मागील चार दिवसात धुळे, जळगाव, पिंपळनेर (ता.साक्री) येथील बाजारात वाढली आहे. यातच जळगाव, धुळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. धुळ्यात ३१ मार्चपर्यंत आठवडी बाजार बंद आहेत. 

जळगाव जिल्ह्यातही आठवडी बाजार शहरात बंद आहेत.  तर ज्या गावात कोरोना रुग्ण आढळले, तेथील आठवडी बाजारही बंद आहेत. हॉटेल व्यवसाय, लग्नसराई यावर परिणाम झाला आहे. यामुळे कांद्याचा उठाव निम्म्याने कमी झाला आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. 

जळगाव येथील बाजारात कांद्याची आवक या आठवड्यात प्रतिदिन ५०० क्विंटल एवढी आहे. धुळ्यातही प्रतिदिन सरासरी ८०० क्विंटल आवक झाली. साक्री व पिंपळनेर येथेही लाल कांद्याची आवक वाढत आहे. किमान दर ७०० रुपये व कमाल १४०० आणि सरासरी दर १००० रुपये प्रतिक्विंटल आहे. सर्वत्र अशीच स्थिती आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची काढणी लांबणीवर टाकली आहे. परंतु पुढेही दरात घसरण सुरूच राहील, असे सांगितले जात आहे. 

आवक वाढण्याचा अंदाज

रखडलेली आवक पुढे आणखी वाढेल. कांदा अधिक दिवस शेतात राखून ठेवणे शक्य नाही, अशी स्थिती शेतकऱ्यांसमोर तयार झाली आहे. जो खर्च केला आहे, तो निघेल की नाही, अशी स्थिती असल्याने शेतकऱ्यांची वित्तीय हानी होईल, असेही दिसत आहे. आठवडी बाजार बंद असल्याने पुढे त्याचा पुरवठा करणे अशक्य झाल्याचे अडतदार, व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यातच यंदा लागवड अधिक होती. यामुळेदेखील आवक अधिक राहील, अशी माहिती मिळाली.


इतर ताज्या घडामोडी
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...
शेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...