Agriculture news in marathi Pressure on onion rates increased | Agrowon

कांदा दरांवरील दबाव वाढला

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

जळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढत असल्याने अनेक शेतकरी मध्य प्रदेश, गुजरातेत कांदा विक्रीसाठी जात आहेत. यातच दरांवरील दबाव दूर करण्यासाठी निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

जळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढत असल्याने अनेक शेतकरी मध्य प्रदेश, गुजरातेत कांदा विक्रीसाठी जात आहेत. यातच दरांवरील दबाव दूर करण्यासाठी निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

कांद्याची आवक मागील महिनाभरापासून स्थिर होती. अशातच या आठवड्यात आवक वाढली आहे. सध्या जळगाव, धुळे, चाळीसगाव, साक्री (जि. धुळे), अडावद (ता. चोपडा), किनगाव (ता. यावल) येथील बाजारात कांद्याची आवक होत आहे. या बाजारांमध्ये मिळून रोज सरासरी पाच ते साडेपाच हजार क्विंटल कांद्याची आवक सुरू आहे. सर्वाधिक आवक साक्री, जळगाव, अडावद, धुळे येथील बाजारात होत आहे. तर किनगाव, चाळीसगाव बाजारातील आवक कमी झाली आहे.

सध्या कमाल दर १६०० रुपये प्रतिक्विंटल, असा आहे. मागील आठवड्यात कमाल दर १८०० रुपयांपर्यंत होता. अर्थातच कमाल दरात क्विंटलमागे २०० रुपयांची घसरण झाली आहे. दरांवरील दबाव वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढत आहे. कारण खानदेशात लागवड वाढली असून, यंदा मार्चनंतर अधिकची आवक होईल. त्या वेळेस दबाव कायम राहिला, तर कांदा परवडणार नाही, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

सध्या कांद्याची आवक जळगाव, चोपडा, भुसावळ, यावल, धुळे, पाचोरा आदी भागातून होत आहे. दर अपेक्षित मिळत नसल्याने अनेक शेतकरी आपल्या कांद्याची पाठवणूक मध्य प्रदेशातील बडवानी, इंदूर व नाशिक जिल्ह्यांतील लासलगावच्या बाजारात करीत आहेत. तेथे कमाल दर २००० रुपयांपर्यंत मिळत आहेत. लाल कांद्याची आवक अधिक आहे. तर पांढऱ्या कांद्याची आवक मात्र नगण्य स्वरूपात होत आहे. कांदा दरांवरील दबाव दूर करण्यासाठी निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी शेतकरी आत्माराम पाटील (कापडणे, जि. धुळे) यांनी केली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...