agriculture news in Marathi pressure of sugar selling Maharashtra | Page 4 ||| Agrowon

साखर विक्रीचा दबाव कायम 

राजकुमार चौगुले
रविवार, 31 जानेवारी 2021

साखर विक्रीच्या दबावाखाली आलेल्या कारखान्यांनी आता नाइलाजास्तव कमी किमतीत साखरेची विक्री सुरू केली आहे.

कोल्हापूर : साखर विक्रीच्या दबावाखाली आलेल्या कारखान्यांनी आता नाइलाजास्तव कमी किमतीत साखरेची विक्री सुरू केली आहे. महाराष्ट्रात साखरेची विक्री २९५० पासून ३१५० रुपये प्रति क्विंटल दराने सुरू असल्याचे काही कारखाना प्रतिनिधींनी सांगितले. किमान विक्री मूल्य ३१०० रुपये असले तरी या दराला मागणी नसल्याने कारखानदार हवालदिल झाल्याचे चित्र याही महिन्यात कायम राहिले. 

जानेवारीच्या शेवटच्या सप्ताहातही कारखानदारांवर साखर विक्रीचा दबाव कायम राहिला. जानेवारी संपत आला तरी जानेवारीच्या कोट्याची साखर विक्री करण्यासाठी देशातील कारखान्यांची केविलवाणी धडपड सुरूच राहिली. यामुळे साखर दरातही वाढ झाली नाही. 

दरम्यान, केंद्राने गुरुवारी (ता.२८) फेब्रुवारी महिन्यातील साखर विक्री कोटा जाहीर केला. फेब्रुवारी महिन्यासाठी १७ लाख टन विक्रीचे उद्दिष्ट केंद्राने दिले आहे. जानेवारीच्या तुलनेत किमान ३ लाख टनांनी हा कोटा घटविल्याने कारखान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. ५४८ कारखान्यांना हा कोटा विभागून दिला आहे. गेल्या दोन महिन्यांचा आढावा घेतल्यास केंद्राने गेल्या वर्षीच्या तुलनेत कोट्यात घटच केलेली आहे. इतके असूनही साखर विक्री होत नसल्याने साखर विक्रीचा प्रश्‍न गंभीरच बनतच असल्याचे चित्र आहे. अजूनही शीतपेय उत्पादक कंपन्या साखरेची मागणी नोंदवत नसल्याने कारखानदारांपुढे बल्क विक्रीची समस्या उभी ठाकली आहे. 

कोटा कमी आल्याने बाजारात काही प्रमाणात तरी सकारात्मक वातावरण राहील, अशी अपेक्षा साखर उद्योगाची आहे. यंदाचा हंगाम सुरू होऊन चार महिने झाले आहेत. साखर उत्पादन द्रुतगतीने होत असल्याने चिंतेत भर पडली आहे. कोणत्याही परिस्थितीत साखरेचे किमान विक्री मूल्य वाढविल्याशिवाय बाजारात तेजीचे वातावरण राहणे अशक्‍य असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

केंद्राने केलेली कोट्यातील घट व फेब्रुवारीत लागणारी उन्हाळ्याची चाहूल कारखानदारांना साखर विक्रीसाठी फायदेशीर ठरेल असा अंदाज असला, तरी शिल्लक साठ्याचा दबाव हा हंगाम संपेपर्यंत कायमच राहील अशी भीती आहे. 

साखरेचे जानेवारीतील दर (रुपये/क्विंटल) 

राज्य किमान कमाल
महाराष्ट्र २९५० ३१५० 
कर्नाटक ३०७५ ३१५०
उत्तर प्रदेश ३१०० ३२१५ 
गुजरात ३१०० ३१५० 
तमिळनाडू ३१०० ३२५० 

इतर अॅग्रोमनी
मोहरीला दराचा ‘तडका’ पुणे ः राजस्थानमध्ये मोहरीच्या दराने हमीभावाचा...
हळदीची आवक वाढू लागली सांगली/परभणी ः बाजार समित्यांत हळदीची आवक वाढू...
देशात विक्रमी फलोत्पादनाचा अंदाज पुणे ः देशात २०२०-२१ मध्ये फलोत्पादनात फळांचे १०३...
चीनकडून शेतीमालाची आक्रमक खरेदी पुणे ः जागतिक पातळीवर जवळपास सर्वच शेतमालाची...
हरभरा दरात घसरणीची शक्यता कमीपुणे ः हरभरा आवक वाढत असून पुढील १० ते १२ दिवसांत...
तेलबिया उत्पादनात वाढ वॉशिंग्टन ः जागतिक तेलबिया उत्पादनात फेब्रुवारी...
सांगली बाजार समितीत हळदीची आवक वाढलीसांगली ः  कोरोना विषाणूचा वाढता...
सरकारी आकड्यांपेक्षा हरभरा उत्पादनात घट यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच पिकांना बदलत्या...
देशात साखर उत्पादनात ४० लाख टनांनी वाढलेकोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांनी...
केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता अनेक...नवी दिल्ली ः केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता...
पाकिस्तानची भारतीय कापसाला पसंती जळगाव ः पाकिस्तान कापसासाठी भारताच्या दारात...
हरभरा बाजारात सुधाराची चिन्हे पुणे ः बाजारात हरभरा आवक सुरू झाली आहे....
बाजारात तूर खातेय भाव; वाढ कायम पुणे ः इतर कडधान्य पिकांसह तूर उत्पादनातही घट...
हळदीला दराचा ‘रंग’ पुणे ः हळद उत्पादनात घट झाल्याने यंदा हळदीचे दर...
अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन नवी दिल्ली ः देशात यंदा अन्नधान्याचे विक्रमी...
राष्ट्रीय खाद्यतेल मिशनचा यंदाही चकवापुणे : राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची यंदाही घोषणा न...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः सोयाबीनने प्लॅंट दरासह बाजार...
हरभरा बाजाराला ‘नाफेड’चा टेकू पुणे ः नाफेडने राज्यनिहाय खरेदीचे उद्दिष्ट जाहीर...
कापसाचा तुटवडा जाणवू लागला जळगाव : देशात सूतगिरण्यांसमोर कापूसटंचाई तयार...
देशातील हरभरा उत्पादनात घट होण्याची...नवी दिल्ली : यंदाच्या हंगामात देशातील हरभरा...