Agriculture news in marathi Pressure on washed onion prices, farmers in crisis | Agrowon

धुळ्यात कांदा दरांवर दबाव, शेतकरी संकटात 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 मे 2020

देऊर, जि. धुळे : लॉकडाऊन व इतर समस्यांमुळे कांद्याचे दर घसरले आहेत. त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून, यासंदर्भात मार्ग निघून शेतकऱ्यांच्या कांद्याची रास्त दरात खरेदी व्हावी यासंबधी नेर (ता. धुळे) येथील शेतकरी सतिश बोढरे यांनी मुख्यमंत्री यांना इ-मेलद्वारे साकडे घातले आहे. 

देऊर, जि. धुळे : लॉकडाऊन व इतर समस्यांमुळे कांद्याचे दर घसरले आहेत. त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून, यासंदर्भात मार्ग निघून शेतकऱ्यांच्या कांद्याची रास्त दरात खरेदी व्हावी यासंबधी नेर (ता. धुळे) येथील शेतकरी सतिश बोढरे यांनी मुख्यमंत्री यांना इ-मेलद्वारे साकडे घातले आहे. 

धुळे, जळगाव जिल्हा कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. पण लॉकडाउनमुळे बाजारात मंदी आहे. उचल नाही. पणन व्यवस्थेला फटका बसला आहे. अशात केंद्रीय कृषी मंत्रालयाने राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाद्वारे (नाफेड) कांद्याची रास्त किंवा परवडणाऱ्या दरात खरेदी करावी व दिलासा द्यावा. यासाठी राज्याने पाठपुरावा करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी केली आहे. 

शेतकरी बोढरे यांनी म्हटले आहे, की धुळे व जळगाव भागात कांदा पीक जोमात असते. यंदा लागवड अधिक झाली. परंतु दर पडले. लॉकडाऊनमुळे उचल कमी आहे. निर्यात, परराज्यातील पाठवणूक सुकर नाही. अडचणी वाढल्या आहेत. कांदा साठवणुकीची चांगली व्यवस्था खानदेशात नाही. उष्णता वाढत आहे. अशा स्थितीत कांदा टिकवून ठेवणे शेतकऱ्यांना शक्‍य नाही. बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. कांदा दर किमान २० ते २५ रुपये प्रतिक्विंटल असायला हवा. परंतु दर पाच ते आठ रुपये प्रतिकिलो, असा आहे. शेतकऱ्यांना हा दर परवडणारा नाही. कोट्यवधींचा फटका शेतकऱ्यांना बसत असून, खर्चही निघणार नाही, अशी स्थिती आहे. सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकरी बोढरे यांनी केली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...