Agriculture news in marathi Prevailing crisis over sorghum, pomegranate with grapes in Solapur | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात ज्वारी, द्राक्षांसह डाळिंबांवर अवकाळी संकट

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 मार्च 2020

सोलापूर : जिल्ह्यात बुधवारी (ता. १८) सलग दुसऱ्या दिवशी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. रब्बी हंगामातील काढणीस आलेली ज्वारी, करडई या पिकांसह द्राक्ष आणि डाळिंब बागांनाही या पावसाचा फटका बसला. सांगोला, पंढरपूर, उत्तर सोलापूर, मंगळवेढा, बार्शी भागात प्रामुख्याने पावसामुळे पिकांवर संकट ओढवले. 

सोलापूर : जिल्ह्यात बुधवारी (ता. १८) सलग दुसऱ्या दिवशी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. रब्बी हंगामातील काढणीस आलेली ज्वारी, करडई या पिकांसह द्राक्ष आणि डाळिंब बागांनाही या पावसाचा फटका बसला. सांगोला, पंढरपूर, उत्तर सोलापूर, मंगळवेढा, बार्शी भागात प्रामुख्याने पावसामुळे पिकांवर संकट ओढवले. 

गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यातील वातावरण बदलले आहे. दिवसभर कडाक्‍याचे ऊन आणि रात्री प्रचंड गारवा, असे वातावरण आहे. बार्शी, पंढरपूर, उत्तर सोलापूर या भागातील द्राक्ष बागा सध्या काढणीच्या स्थितीमध्ये आहेत. त्यात आता पावसाने हजेरी लावल्याने पावसाचे पाणी द्राक्ष घडामध्ये साचून राहत असल्याने घड खराब होण्याचे प्रकार आहेत. त्यातच पुढील तीन-चार दिवस हीच स्थिती राहण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. 

उत्तर सोलापुरातील पडसाळी, वांगी, रानमसले भागात द्राक्षाशिवाय काढणीला आलेली ज्वारी, गहू, हरभरा, आंबा या पिकांनाही अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. सांगोल्यात रात्री साडेसातच्या सुमारास वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह तासभर अवकाळी पाऊस झाला. या पावसाने द्राक्ष, आंबा, डाळिंब, हरभरा, गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंगळवेढ्यातही ज्वारी, करडई, द्राक्षे, डाळिंब, आंबा पिकाचे नुकसान झाले. ग्रामीण भागात विद्युतपुरवठा खंडित झाला. 

द्राक्ष बागायतदारांचा जीव कोंडीत

बार्शी तालुक्‍यातील चिंचोली, कुसळंब, पांगरी परिसरात रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. सध्या द्राक्षे काढणीचा हंगाम चालू आहे. अधूनमधून वातावरणात होत असलेल्या बदलाबरोबर अवकाळी पावसाने द्राक्षे विक्रीस फटका बसत आहे. मागील दोन दिवसांपासून ऊन अन्‌ ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास पुन्हा रिमझिम पावसाबरोबर सरी कोसळल्याने वातावरणात गारठा निर्माण झाला होता. 

ज्वारी भिजली, काळी पडणार

बार्शी तालुक्यात सध्या ज्वारी, हरभरा, गहू, कांदा आदी पिके काढून मळणीची घाई करत असताना अचानक आलेल्या अवकाळी पावसाने पिके भिजली आहेत. मंगळवेढा, उत्तर सोलापुरातही ज्वारी, करडई, द्राक्षे, डाळिंब, आंबा पिकाचे नुकसान झाले.


इतर बातम्या
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
आहारात फळे, भाज्यांचा वापर वाढवा : डॉ....सोलापूर : "कोरोना महामारीचे संकट सर्वांनाच...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...