सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात पिकावर वाढतोय कीड-रोगांचा प्रादुर्भाव
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात पिकावर वाढतोय कीड-रोगांचा प्रादुर्भाव

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात पिकावर वाढतोय कीड-रोगांचा प्रादुर्भाव

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. एरवी दुपारनंतर पडणाऱ्या पावसाने बुधवारी (ता. २३) पहाटेपासूनच हजेरी लावली. यामुळे काही ठिकाणी परिपक्व झालेल्या भातावर कीड - रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. तसेच तयार झालेला, पण पावसामुळे कापणी होऊ शकलेली नाही अशा भाताला कोंब फुटण्यास सुरवात झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सिंधुदुर्गातील भातशेती परिपक्व होऊन आता पंधरा ते वीस  दिवसांचा कालावधी लोटला आहे. यामध्ये एक ते दोन दिवसच पाऊस पडलेला नाही. मात्र काही दिवस सकाळच्या सत्रात उन्हे आणि सायंकाळी पाऊस पडत होता. या कालावधीत काही शेतकऱ्यांनी किरकोळ स्वरूपात भात कापणी केली. परंतु आता परिपक्व झालेल्या भातपिकावर कीड- रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. 

भातांच्या लोंब्याचा खच मळ्यांमध्ये पडत आहे, तर दुसरीकडे सतत पडत असलेल्या पावसामुळे तयार झालेला पण पावसामुळे कापणी होऊ शकलेली नाही अशा भाताला कोंब फुटण्यास सुरवात झाली आहे. पाणथळ जमिनीतील काही शेतकऱ्यांच्या शेतीचे यापूर्वीच नुकसान झाले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com