Agriculture news in marathi To prevent corona superspreader Dhadak campaign in Pune district | Page 3 ||| Agrowon

कोरोना सुपरस्प्रेडर रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात धडक मोहीम

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 एप्रिल 2021

जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर गावांगावांमध्ये तपासणी सुरू केली आहे. जिल्ह्यातील हॉटस्पॉट असलेल्या १०४ गावांतील शंभर टक्के म्हणजे तब्बल ४ लाख ८२ हजार ६८७ लोकांची तपासणी करण्यात आली आहे.

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात झपाट्याने होणारा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर गावांगावांमध्ये तपासणी सुरू केली आहे. जिल्ह्यातील हॉटस्पॉट असलेल्या १०४ गावांतील शंभर टक्के म्हणजे तब्बल ४ लाख ८२ हजार ६८७ लोकांची तपासणी करण्यात आली आहे.

 तपासणीत सुमारे १० हजार २०७ लोकांना कोरोनाची लक्षणे दिसून आली. या लोकांची कोरोना चाचणी केल्यानंतर २५.६३ टक्के म्हणजे २ हजार ५९१ नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याने निष्पन्न झाले आहे. या चाचण्यांमुळे भविष्यातील फैलाव वेळीच रोखला गेला. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात कोविड केअर सेंटरची संख्या वाढविणे, जास्तीत जास्त कोरोना पॉझिटिव्ह लोकांना त्वरीत उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याची जबाबदारी प्रशासनच घेत आहे. याच सोबत कोरोना लसीकरणावर देखील अधिक भर दिला आहे. जिल्ह्यातील सुपरस्प्रेडर लोकांची तपासणी करणे आणि हॉटस्पॉट गावांतील शंभर टक्के लोकांची तपासणी, असे विविध उपक्रम युद्धपातळीवर हाती घेतले आहेत.  

पंधरा दिवसांत जिल्हा प्रशासनाच्या वतीने अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त गटाने १०४  हॉटस्पॉट गावातील घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली. या तपासणीमध्ये सुमारे पावणे पाच लाख लोकांमध्ये केवळ २ हजार ५९१ लोक कोरोनाची लागण झाल्याने आढळून आले. या बाधित नागरिकांना तातडीने गरजेनुसार गृहविलगीकरणाबरोबरच संबधित तालुक्यातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. यात १ हजार ९११ लोकांनी कोविड केअर सेंटरमध्ये जाण्याचा तर ६३१ नागरिकांनी गृहविलगीकरणाचा निर्णय घेतला.


इतर ताज्या घडामोडी
शिरोळमधील ३७ हजार कुटुंबांना...जयसिंगपूर, जि. कोल्हापूर : संभाव्य पुराच्या...
सौरउर्जेद्वारे २५ हजार मेगावॅट ...औरंगाबाद : राज्यात यापुढे नवीन औष्णिक प्रकल्प...
पीककर्ज देणार नसाल तर किडनी विक्रीची...अकोला : गेला हंगाम सुरळीत न गेल्याने अनेक...
भरड धान्याची हमीभावाने खरेदी सुरू ः...नाशिक : ‘‘पणन हंगाम २०२०-२१ रब्बीसाठी गहू व...
माजलगाव तालुक्यात मशागत आटोपली;...माजलगाव, जि. बीड : मागील दोन वर्षांपासून परतीच्या...
शेतकऱ्यांच्या मदतीला सदैव तत्पर राहा ः...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या...
जालना जिल्ह्यात मक्याचे पस्तीस हजार...जालना : ‘‘जिल्ह्यात पाच केंद्रांत मक्याची किमान...
खानदेशात वादळामुळे झालेल्या २५ टक्के...जळगाव : खानदेशात पूर्वमोसमी पाऊस व वादळाने मे...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची...परभणी / हिंगोली : कोरोनामुक्त गाव या स्पर्धेच्या...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीची १७ केंद्रांत...जळगाव : जिल्ह्यात १७ केंद्रांमध्ये मका, ज्वारी व...
शेती तंत्रासाठी ई-पॉकेट बुक उपयोगीसोलापूर ः कृषी क्षेत्रात तरुणांना आधुनिक शेती...
कृषी कायद्यात करणार सुधारणा ः...मुंबई ः केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे...
इंधन दरवाढप्रश्‍नी काँग्रेसचे राज्यभर...नागपूर ः पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने होणाऱ्या...
पुण्यात भेंडी, गवारीच्या दरात सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
मॉन्सूनची कर्नाटकपर्यंत मजलपुणे : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) केरळात दाखल...
बियाणेनिर्मितीसाठी नवी कार्यपद्धती लागूपुणे ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
केळी निर्यातीसाठी आता ‘बनाना नेट’पुणे ः द्राक्ष, डाळिंब, आंबा, भाजीपाला,...
दूधदरप्रश्‍नी लढा उभारणार ः अजित नवलेनगर ः कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने दुधाची मागणी...
कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती...मुंबई : राज्यामध्ये कृषी प्रक्रिया व मालाची...
विमा कंपन्यांशी मंत्र्यांचे साटेलोटे ः...नागपूर : पीकविमा कंपन्यांच्या विरोधात यापूर्वी...