agriculture news in Marathi, Prevented to farmers who was going to long march, Maharashtra | Agrowon

किसान लाँग मार्चला जाणाऱ्या शेतकऱ्यांना रोखले

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

धुळे  : किसान लाँग मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांची सोमवारी (ता.१८)  धुळ्यात धरपकड करण्यात आली. सत्यशोधक शेतकरी सभेचे नेते किशोर ढमाले, सुभाष काकुस्ते, मेरुलाल पावर, वंजी गायकवाड, यशवंत माळचे यांना दहिवेलमधील सत्यशोधक लाल बावटा कार्यालयातून  सोमवारी धुळे पोलिसांनी अटक केली. या प्रकाराचा सत्यशोधक शेतकरी सभेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला आहे.   

धुळे  : किसान लाँग मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांची सोमवारी (ता.१८)  धुळ्यात धरपकड करण्यात आली. सत्यशोधक शेतकरी सभेचे नेते किशोर ढमाले, सुभाष काकुस्ते, मेरुलाल पावर, वंजी गायकवाड, यशवंत माळचे यांना दहिवेलमधील सत्यशोधक लाल बावटा कार्यालयातून  सोमवारी धुळे पोलिसांनी अटक केली. या प्रकाराचा सत्यशोधक शेतकरी सभेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला आहे.   

सत्यशोधक शेतकरी सभेने बुधवारी (ता.२०) किसान सभेच्या नाशिक येथून निघणाऱ्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी पिंपळनेर (ता. साक्री, जि. धुळे) येथून नाशिक आणि पुढे मुंबईपर्यंत पायी मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार हजारो शेतकरी पिंपळनेर येथे एकत्र आले. लागलीच पोलीस आले, त्यांनी लाल बावटा कार्यालयात सत्यशोधक नेत्यांशी सुमारे अडीच तास चर्चा केली.

त्यानंतर तुम्हाला मोर्चा काढता येणार नाही, असे सांगून पोलिसांनी किशोर ढमाले, सुभाष ककुस्ते, वांजी गायकवाड, यशवंत माळचे, मेरूलाल पवार ताब्यात घेतले आणि नंतर सोडून दिले. मग कष्टकरी शेतकऱ्यांचे आंदोलन हाणून पाडण्याचे हे कारस्थान आहे. ही लोकशाही मार्गाने आंदोलने करणाऱ्यांवरील दडपशाही आहे, असे म्हणत सत्यशोधक कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध 
केला.

दहिवेल येथील सत्यशोधक कार्यालयातून प्रमुख कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर तेथून १५ किलोमीटरवर पिंपळनेर येथे मनसाराम पवार, दीपक जगताप, जितेंद्र पवार, माळचे, जीवन गावित यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. अखेर ३००० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. दुसरीकडे मात्र अटक केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांशी दुष्काळ, वनहक्क, रोजगार आदी प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली, अशी माहिती मिळाली.


इतर ताज्या घडामोडी
हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी घोषणेची...पुणे : महाविकास आघाडीच्या किमान समान...
हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावच...मुंबई  ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू...
गायीच्या दूध खरेदी दरात एक रुपयाने वाढपुणे  ः परराज्यांसह भुकटी उद्योगांकडून...
लाल कांद्याच्या दरात सुधारणा नाशिक  : दरवर्षीच्या प्रमाणे लाल कांद्याची...
सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीपोटी मिळणार...सोलापूर  : ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात...
ठाकरे सरकारचे उद्यापासून पहिलेच अधिवेशनमुंबईः नागपूर येथील छोटेखानी हिवाळी अधिवेशनात...
ग्रासपेंटिंगच्या माध्यमातून...शिराढोण ः उस्मानाबाद जिल्ह्यातील निपाणी (ता. कळंब...
तनपुरे कारखाना चालावा ही जिल्हा बॅंकेची...नगर : "डॉ. बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याची...
औरंगाबादमध्ये कांदा १२०० ते ८००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नांदेड, परभणी, हिंगोलीत नुकसानीपोटी ५७८...नांदेड : अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या...
कोल्हापुरात पुष्प प्रदर्शनास प्रारंभकोल्हापूर  : गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर...
कळवण येथे शेतकरी संघटनेचे निर्बंधमुक्ती...नाशिक  : शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी...
नुकसानीमुळे पीककर्जाकडे शेतकऱ्यांचा कल पुणे ः अतिपावसामुळे खरीप पिकांचे नुकसान...
सटाणा शहरात कचऱ्यापासून होणार...नाशिक : सटाणा शहराने स्वच्छतेच्या बाबतीत...
पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आज...पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत कापूस...औरंगाबाद : आधी दुष्काळाचा ताण, त्यानंतर...
पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या...पुणे ः जिल्ह्यात पुढील वर्षी जुलै ते डिसेंबर २०२०...
काळ्या ज्वारीमुळे शासकीय खरेदीला ब्रेकअमरावती  ः अचलपूर खरेदी विक्री संघाला ज्वारी...
मराठवाड्यातील १४ लाख ५५ हजार हेक्‍टरवर...उस्मानाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १४ लाख...
अकोल्यात सोयाबीन पोचले ४१०० पर्यंतअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला...