agriculture news in marathi Preventive measures for stomach disease in animals | Agrowon

असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंध

डॉ. गिरीश यादव, डॉ. दिनेश लोखंडे
मंगळवार, 28 जानेवारी 2020

सर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी हमी नसल्यामुळे बऱ्याचदा जनावरांना निकृष्ट प्रतीचा चारा दिला जातो. त्यामुळे जनावरांना पोटफुगी व पचनसंस्थेचे इतर अनेक रोग उद्भवतात. जनावरे पोटफुगीने आजारी पडतात व कधी कधी या आजाराची तीव्रता इतकी जास्त असते की जनावरे दगावतात, त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते.

सर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी हमी नसल्यामुळे बऱ्याचदा जनावरांना निकृष्ट प्रतीचा चारा दिला जातो. त्यामुळे जनावरांना पोटफुगी व पचनसंस्थेचे इतर अनेक रोग उद्भवतात. जनावरे पोटफुगीने आजारी पडतात व कधी कधी या आजाराची तीव्रता इतकी जास्त असते की जनावरे दगावतात, त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते.

सर्व मोसमात जनावरांमध्ये जास्त प्रमाणात आढळणारा आजार म्हणजे ‘पोटफुगी’ होय. खाद्यामधील झालेल्या बदलामुळे अखाद्य पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे जनावरांच्या पोटातील अन्नावर किण्वनाची प्रक्रिया जास्त प्रमाणावर होते. त्यामुळे पोटात वायू जास्त प्रमाणात तयार होतो. हा वायू नैसर्गिकरीत्या बाहेर टाकला जाऊ शकत नाही. या वाढलेल्या वायूचा ताण पोटाच्या पिशव्यावर होतो, यालाच ‘पोटफुगी’ म्हणतात.

कारणे

 • कोवळा, जास्त प्रथिनयुक्त व किण्वन करू शकणाऱ्या ज्वारी, बाजरी व वाटणा, मक्याची हिरवी धाटे यासारख्या वनस्पती जास्त प्रमाणात खाल्ल्यास, जास्त प्रमाणात उसाची मळी, चोथरी जनावरांच्या खाद्यात गेल्यास जनावरांचे पोट फुगते.
   
 • अन्ननलिका कोंडल्यास, जनावरांच्या आंतपटलाच्या हर्निया, धनुर्वात, अन्ननलिकेवरील व जठरावरील सूज, जंताचा प्रादुर्भाव व शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पोटफुगी होते.
   
 • काही जनावरांत आनुवंशिकतेने तोंडातील लाळेचा होणारा स्राव हा कमी प्रमाणात असल्यामुळे अन्न चावताना किवा रवंथ करताना लाळ अन्नात योग्य प्रमाणात मिसळू शकत नाही. त्यामुळेसुद्धा पोटफुगी होते.
   
 • ज्वारी, गहू, बाजरी यांची कणसे, दाणे खाल्ल्यामुळेसुद्धा पोटफुगी होते. अखाद्य वस्तू उदा. तार, खिळा, लाकूड, पत्रा, चामडे, कापड, प्लॅस्टिक व इतर अखाद्य वस्तू खाल्यास पोटफुगी होते.

लक्षणे

 • प्रथम जनावर खात पित नाही, ते सुस्तावते. जनावरांच्या पोटाचा आकार (विशेषतः डाव्या भकाळीचा) जास्त प्रमाणात वाढतो, जनावर डोळे व मान उंचावून ताणते, पोटात त्रास होत असल्यामुळे जनावर दात खाते, मागच्या पायाने पोटावर लाथा मारते, डाव्या भकाळीकडे पाहते, तोंडाने श्वासोच्छवास करते, लाळ गाळते.
   
 • पोटातील वाढलेल्या वायूमुळे पोटाच्या पिशव्यांचा दाब फुफ्फुसावर व ह्रदयावर पडतो. त्यामुळे जनावरास श्वासोच्छवासास त्रास होतो.
   
 • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. जनावर पाणी पिण्यास पाहते व डाव्या भकाळीवर हाताने मारून पाहिल्यास पोटात वायू असल्याचा आवाज येतो.
   
 • कधी कधी ही पोटफुगी एवढी वाढते की, पोटाच्या पिशव्यांचा ताण फुफ्फुसावर जास्त प्रमाणात येऊन दम कोंडी होऊन जनावर कोसळते. तसेच फुफ्फुसावर जास्त दाब वाढला तर श्वास कोंडून जनावर दगावू शकते.

उपचार

 • लक्षणे दिसताच तत्काळ पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. जनावरांना दिले जाणारे व पोटात वायू तयार करणारे अन्न व पाणी त्वरित थांबवावे.
   
 • जनावर अशा रीतीने बांधावे की, पुढचे पाय उंचावर व मागचे पाय उतारावर असतील, जेणेकरून फुगलेल्या अन्नाच्या पिशवीचा दाब फुफ्फुसावर पडणार नाही.
   
 • जनावराच्या डाव्या भाकाळीवर हाताने मालिश करावे.
   
 • जनावरांच्या तोंडात आडवी कडुलिंबाची एक फूट लांबीची लाकडी काठी ठेवून ती मुरकीस दोन्ही बाजूस बांधावी. अशा प्रकारे ही काठी तोंडात राहिल्यामुळे जनावर त्या काठीस सतत चघळत राहील. त्यामुळे लाळेचे प्रमाण वाढून पोटफुगी कमी होण्यास मदत होईल.

(टीपः उपचार करताना पशुवैद्यकाचे मार्गदर्शन घ्यावे.)

प्रतिबंध

 • कोवळ्या, जास्त प्रथिनयुक्त व किन्वन करू शकणाऱ्या वनस्पती, ज्वारी, बाजरी, वाटणा, मक्याची हिरवी धाटे यासारख्या वनस्पती, उसाची मळी, चोथरी जास्त प्रमाणात देऊ नये.
   
 • जंताचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दर ३ महिन्यानंतर जनावरांना जंतानाशकाची मात्रा द्यावी.
   
 • जनावरांना रोज ५० ग्रॅम क्षार मिश्रण खाद्यातून द्यावे.
   
 • जनावरांना उरलेले शिळे अन्न भाज्या देऊ नये.
   
 • ज्वारी, गहू, बाजरी यांची कणसे, दाणे जास्त प्रमाणात खाऊ देऊ नये. अखाद्य वस्तू उदा. तार, खिळा, लाकूड, पत्रा, चामडे, कपडे, प्लॅस्टिक व इतर अखाद्य वस्तू खाऊ देऊ नये.

संपर्कः डॉ. गिरीश यादव, ७६६६८०८०६६
(मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई)


इतर कृषिपूरक
जनावरांतील मायांग बाहेर येण्याची समस्याम्हशीमधील मायांग बाहेर येण्याचे प्रमाण इतर बाकी...
हिरव्या चाऱ्याच्या पूर्ततेसाठी मुरघास...हिरव्या चाऱ्याच्या व्यवस्थापनावर उपाययोजना म्हणून...
वाहतूक शेळ्या, मेंढ्यांची...तापमानात जास्त वाढ झाल्यास, शेळ्यांना शरीराचे...
व्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणीभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली. सर्व बचत...
कृषी पर्यटन ः आव्हानात्मक पूरक व्यवसायवसंताच्या मनातील कृषी पर्यटनाच्या विचाराला...
ऋतुमानानुसार म्हशीतील प्रजनन व्यवस्थापनअधिक दूध उत्पादनाकरिता म्हशीमधील प्रजनन सक्षम...
जैवपुंज निर्मितीसाठी विविध कार्बन स्रोतपाण्याचे तापमान, सामू, विरघळलेला प्राणवायू...
जनावरांच्या आहारामध्ये पोषकद्रव्ये...दुधाळ जनावरांच्या शरीराची प्रसूतिदरम्यान झालेली...
मेंढ्यांची संवाद साधण्याची पद्धतमेंढ्यांचे आवाज हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात...
मत्स्यशेतीसाठी पाण्याची गुणवत्ता...मत्स्यशेती यशस्वी होण्यासाठी मत्स्य टाक्यांची...
वयानुसार पुरवा कोंबड्यांना संतुलित खाद्यकुक्कुटपालनामध्ये एकूण खर्चाच्या जवळ जवळ ६० ते ७०...
फळबागेला दिली शेळीपालनाची जोडअजगणी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जगदीश...
जनावरांतील गोचीड तापगोचीड कान, पंजा, उदर, बारीक व नाजूक त्वचा तसेच...
जाणून घ्या ग्राहक संरक्षण अधिनियम, १९८६ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी...
शेळ्यांना द्या समतोल आहार शेळीच्या प्रजननक्षमता वाढीस आहाराचे...
मेंढीपालनाचे वार्षिक वेळापत्रकगाभण मेंढ्यांकडे विशेष लक्ष द्यावे. नवजात...
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
आरोग्यदायी शेळीचे दूधशेळीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांवरील...
बहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...