नाशिक बाजारात कारल्याचे दर टिकून

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कारल्याची आवक ५७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २९१५ ते ४५८५ दर मिळाला. सर्वसाधारण दर ३७५० रुपये राहिले. आवक सर्वसाधारण असल्याने दर स्थिर आहेत, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
नाशिक बाजारात कारल्याचे दर टिकून
नाशिक बाजारात कारल्याचे दर टिकून

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कारल्याची आवक ५७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २९१५ ते ४५८५ दर मिळाला. सर्वसाधारण दर ३७५० रुपये राहिले. आवक सर्वसाधारण असल्याने दर स्थिर आहेत, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजारात शेतमालाची आवक सध्या सर्वसाधारण असून दरही स्थिर आहेत. वांग्याची आवक १५४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २००० ते ७००० असा दर मिळाला. त्यास सरासरी दर ४००० राहिला. फ्लॉवरची आवक ११४६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५७० ते १११० दर मिळाला. त्यास सरासरी दर ८६० राहिला. कोबीची आवक १०९६ क्विंटल झाली. तिला १६५ ते २९० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २१५ राहिले.

ढोबळी मिरचीची आवक १०३ क्विंटल झाली. तिला १८७५  ते २८७५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० राहिले. पिकॅडोर मिरचीची आवक ७ क्विंटल झाली. तिला १००० ते १२५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ११२५ राहिले.

भोपळ्याची आवक ८३८ क्विंटल झाली. त्यास ४६५ ते १५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १३३५ राहिला. दोडक्याची आवक २३ क्विंटल झाली. त्यास ४१६५ ते ५००० असा दर मिळाला.सर्वसाधारण दर ४५८५ राहिला. गिलक्याची आवक १९ क्विंटल झाली. त्यास २५०५ ते ३९६० दर मिळाला. सर्वसाधारण दर ३३३५ राहिला. भेंडीची आवक ४२ क्विंटल झाली. त्यास १६६० ते ३३३० दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० राहिला.

काकडीची आवक ५०० क्विंटल झाली. तिला १५०० ते ३२५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० राहिला.  लाल पोळ कांद्याची आवक १३६० क्विंटल झाली. त्यास ८२५ ते ३५५० असा दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर २४०० राहिला. बटाट्याची आवक २५९० क्विंटल झाली. त्यास ११०० ते १८५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५० राहिला. लसणाची आवक १० क्विंटल झाली. त्यास ३००० ते ९४०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ६७०० राहिला.  

फळांमध्ये डाळिंबाची आवक २६ क्विंटल झाली. त्यास २००० ते ११००० दर होता. सर्वसाधारण दर ८००० राहिला. बोरांची आवक १२५ क्विंटल झाली. त्यास ७०० ते १८०० दर मिळाला. सर्वसाधारण दर १२०० राहिला.  संत्रीची आवक ९५ क्विंटल झाली. तिला २००० ते ३५०० दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० राहिला. लिंबूची आवक ७० क्विंटल झाली. त्यास ७५० ते १७५० दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५० राहिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com