agriculture news in marathi, price of cattle become decrease, sangli, maharashtra | Agrowon

मिरज बाजारात जनावरांचे दर घटले
अभिजित डाके
रविवार, 31 मार्च 2019

चारा नाही, पाणी नाही. वैरण विकत देखील मिळत नाही. जनावरं जगवायची कशी, असा प्रश्न आहे. दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे मिरज येथील जनावरे बाजारात गाई विकायला घेऊन आलोय. पूर्वी दूधाळ गाईची किंमत ६० ते ७० हजार होती आता ३० ते ४० हजार रुपयांना पण कोणी घेत नाही. 
- मारुती आण्णा जाधव, कवठेमहंकाळ, जि. सांगली.
 

 सांगली ः चारा महागलाय, पाणी नाय, केवळ दुधाच्या पैश्यावर प्रपंच चालवणं कठीण झालाय. दोन पैक मिळत्याल म्हणून दावणीची जित्राबं इकायला घेऊन आलुया. बाजारात बी दर पडल्याती. दुभत्या जनावरांचा दर ६० हजार ते ७० हजार रुपयांवरुन ३० ते ४० हजार रुपयांपर्यंत कमी झाल्याती; तरीबी कुणी जनावरं खरेदी करत नसल्याचे मिरज येथील बाजारात जनावरे विक्रीसाठी आलेले पशुपालक हताश होऊन सांगत होते.

मिरज येथे दर बुधवारी जनावरांचा बाजार भरला जातो. या बाजारात मंगळवारी रात्रीपासून जनावरांची आवक होते. हा बाजार पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. सांगली जिल्ह्यासह, सोलापूर, कर्नाटक, कराड, शिरोळ, हातकणंगले भागातून येथे जनावरे विक्रीसाठी पशूपालक येतात. व्यापाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे. खरेदी करण्यासाठी नेहमीच चढाओढ राहत असल्याने सातत्याने दर चढे राहतात. 

दुष्काळी भागातील जनावरांना चारा मिळत नसल्याने मिरज येथे बुधवारी (ता.२७) सकाळपासून गाई, म्हैशी विक्रीसाठी येत होत्या. जनावरे विक्रीसाठी पशुपालकांची धडपड सुरू होती. जनावरांचा दर चांगले मिळतील अशी त्यांना आशा होती. व्यापारी जनावरे खरेदीसाठी पुढे येत होते. केवळ दराची चौकशी करत होते. खरेदी केली तर चारा कुठून आणायचा, असा प्रश्न व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यामुळे जनावरांची खरेदी देखील कमी झाली असल्याचे चित्र बाजारात दिसत होते. 

पन्नास टक्क्यांनी आवक झाली कमी
सांगलीसह सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. चाऱ्याचीही अवस्था बिकट झाली आहे. जनावरे कशी जगवायची या विवंचनेत पशुपालक आहेत. वैरणीचा दर शेकडा चार ते पाच हजार रुपये आहे. तेही न परवडणारे आहेत. जनावरांना चारा उपलब्ध होत नसल्याने पशूपालक जनावरे विक्रीसाठी पुढाकार घेत आहेत. मात्र, जनावरे खरेदीसाठी कोणीच पुढे येत नसून खरेदी करण्यांची संख्यादेखील कमी झाली आहे. त्यामुळे जनावरांच्या बाजारात ५० टक्के आवक कमी झाली आहे.
--
म्हशींना मागणी; पण खरेदीसाठी उत्साह नाही
मिरज बाजारात गाई आणि म्हशींची आवक कमी झाली आहे. परंतु म्हैशींच्या दरात १० ते १५ हजार रुपयांनी वाढ झाली आहे.  म्हशींचे दर जरी वाढले असले तरी खरेदीसाठी पशूपालक पुढे येताना दिसत नाहीत. बहुतांश नदीकाठचे पशुपालक म्हशींची खरेदी करतात. परंतु दहा म्हशी मागे दोन ते तीन म्हशींची खरेदी होताना दिसते आहे.

गाईच्या दुधाचे दर फारच कमी आहेत. शासनाने गाईच्या दुधाला अनुदान जाहीर केले, पण ते अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे जनावरे सांभाळणे मुश्कील झाल्याने गाई विक्रीस घेऊन आलोय. मात्र इथं पण गाईला दर मिळत नाही. अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे,अशी माहिती तारदाळ, (जि. कोल्हापूर) येथील  निरगोंड तुकाराम जाधव यांनी सांगितले.

जानेवारीत असलेले गाईंचे दर

  • लहान    ८००० ते १५,०००
  • मोठी    १५,००० ते ७५,०००

सध्याचे गाईंचे दर

  • लहान    ३००० ते १०,०००
  • मोठी    १०,००० ते ४०,००० 

जानेवारीतील म्हशींचे दर 

  • रेडी     ६५०० ते १५,०००
  • म्हैस     ६५,००० ते ७०,००० 

सध्याचे म्हशींचे दर 

  • रेडी     ७५०० ते २०,०००
  • म्हैस     ७५,००० ते ९०,००० 

इतर अॅग्रोमनी
मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलहळदीच्या नोव्हेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती...
एचटी कापूस वाण परवानगीची बियाणे...नागपूर ः शेतकऱ्यांकडून अवैधरीत्या तणाला सहनशील (...
मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
कागलचा शाहू कारखाना देशात सर्वोत्कृष्टनवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या...
पोल्ट्रीला धान्य पुरवठ्यासाठी...पुणे : विविध कारणांमुळे तोट्यात चाललेल्या लेअर...
स्फुरद, पालाशयुक्त खतांसाठी अनुदान दर...नवी दिल्ली : स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक...
ऊस बियाणे विक्रीसह भाडे तत्त्वावरील...उसाच्या बियाणे प्लॉटच्या माध्यमातून एकरी तीस ते...
उत्तर प्रदेशात ५१४ कोटींचा ‘पेप्सिको’चा...नवी दिल्ली : अन्न आणि शीतपेय उत्पादनात मोठी...
मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीचा वाढीचा कलपुढील महिन्यात रब्बी मका, गहू आणि हरभरा यांचे भाव...
ओढकामाच्या बैलांवर येतेय गदा ट्रॅक्टरच्या वाढत्या प्रमाणामुळे ओढकामाच्या...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
बांधावरचा शेवगा देतो भरघोस उत्पन्न पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
बाजारात हळदीचे दर दबावातसांगली ः देशात हळद उत्पादनाला पोषक वातावरण...
वायदे बाजार : मका, गहू, हळदीच्या...सध्या बाजारपेठेत मक्याची मागणी वाढत आहे. या...
सेंद्रिय घटकांच्या वापरातून शेती आणली...पिकांचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीची सुपीकता या...
कापूस, मका, सोयाबीनच्या भावात वाढरब्बी पिकांचे भाव आवकेमुळे कमी झाले आहेत....
घरपोच चारा विक्रीतून मिळविले...नागपूरपासून ६५ कि.मी. वरील अरोली (ता. मौदा) हे...
सुधारित बहुपीक पद्धतीतून उत्पन्नामध्ये...चिदगिरी (जि. नांदेड) येथील कैलास गिरी यांनी...
सरकीने मोडला दराचा उच्चांकजळगाव ः कापसासह सरकीच्या दरानी नवा उच्चांक गाठला...