Agriculture news in marathi The price of cow's milk has been reduced by two rupees | Page 2 ||| Agrowon

गाईच्या दुधाचे दर दोन रुपयांनी केले कमी 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 एप्रिल 2021

एक एप्रिलपासून अपवाद वगळता राज्यातील बहुतांश संघांनी गाईच्या दुधाचे प्रति लिटर दोन रुपये दर कमी केले आहे. केवळ दोन संघांनी एक रुपया प्रति लिटर दर कमी केले आहेत.

नगर : कोरोना संसर्गाचा धोका वाढत असल्याने आता कुठे सावरत असलेल्या दूध व्यवसायावर पुन्हा एकदा संकटात येऊ लागला आहे. एक एप्रिलपासून अपवाद वगळता राज्यातील बहुतांश संघांनी गाईच्या दुधाचे प्रति लिटर दोन रुपये दर कमी केले आहे. केवळ दोन संघांनी एक रुपया प्रति लिटर दर कमी केले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक पुन्हा एकदा हवालदिल झाले आहेत. दर कमी झाल्याने दररोज राज्यातील दूध उत्पादकांना अडीच ते तीन कोटींचा फटका बसत आहे. 

राज्यात साधारण दीड कोटी लिटरच्या जवळपास गाईच्या दुधाचे दररोज संकलन केले जाते. संकलित होणाऱ्या दुधापैकी चाळीस टक्के दुधाची पावडर व उपपदार्थ होतात. उर्वरित दूध थेट ग्राहकांना पिशवीतून वितरित केले जाते. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे दुधाची मागणी घटली व दूध पावडरचे दर कमी झाले होते. त्यामुळे दुधाचे दर पडून ते थेट १७ ते १८ रुपयांवर आले होते. कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर मागणी वाढल्याने गेल्या तीन महिन्यांपासून दराची परिस्थिती काहीशी सुधारली होती. ३.५ फॅट व ८.५ एफएनएस असलेल्या गाईच्या दुधाला अलीकडे ३१ ते ३२ रुपयांपर्यंत दर मिळत होता. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून सातत्याने तोटा सोसत असलेल्या दूध उत्पादकांना दिलासा मिळत होता, परंतु सध्या २८ ते २९ रुपये दर मिळत आहेत. 

मात्र पंधरा दिवसांपासून कोरोना संसर्ग वाढत असल्याने राज्यातील बहुतांश भागांत लॉकडाउनची चर्चा होत आहे. काही जिल्ह्यांत लॉकडाउन झाले आहे. आठवडे बाजार, हॉटेल, लग्नसोहळे व इतर मोठे, धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. याच कार्यक्रमात तसेच हॉटेल्सला बटर, पनीर, दही, ताक, लस्सी, आइस्क्रीम याला मागणी असते. मात्र लॉकडाउनच्या भीतीने आठ दिवसांपासून वीस टक्के मागणी कमी झाली आणि दूध पावडरीचे दरही कमी झाल्याचा दावा खासगी दूध संघाकडून केला जात आहे. 

या सर्व बाबींचा गंभीर परिणाम दिसत असून, एक एप्रिलपासून दोन संघ वगळता राज्यातील खासगी दूध संघानी प्रति लिटर दोन रुपये दर कमी केले आहेत. एक दूध संकलन केंद्र चालकाने सांगितले. ‘‘आम्हाला तशा तोंडी सूचना दिल्या आहेत. अशीच परिस्थिती राहिली, तर अजून दर कमी होण्याची भीती आहे. या प्रकाराने दूध उत्पादक पुरता उद्‌ध्वस्त होईल. सरकारनेच दूध उत्पादकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी.’’ 

लॉकडाउन होईल याची सगळ्यांनाच भीती आहे. त्यामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांची खरेदी कमी झाल्याने साधारण दुधाची मागणी वीस टक्क्यांनी घटली आहे. त्याचा परिणाम निश्‍चित दरावर परिणाम होत आहे. 
- प्रकाश कुतवळ, सचीव, महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ. 

गेल्या वर्षभरापासून शेतकरी वेगवेगळ्या संकटाने पुरला खचून गेला आहे. दुधातून गेल्या वर्षी मोठा तोटा सहन केला. गेल्या दोन महिन्यांपासून कुठे परिस्थिती सुधारली की लगेच कोरोनाच्या कारणाने दुधाचे दर कमी केले आहेत. असेच राहिले तर पुन्हा एकदा दूध व्यवसाय अडचणीत येईल. शासनाने आता लक्ष घालून शेतकऱ्यांचा विचार करत दुधाचे दर कमी होणार नाहीत याचा विचार करावा. 
- नंदकुमार रोकडे, दूध उत्पादक, खडकी, ता. नगर, जि. नगर


इतर अॅग्रो विशेष
‘महाडीबीटी’वरील बियाणे अनुदान अर्जासाठी...पुणे ः राज्यात खरीप हंगामासाठी ‘महाडीबीटी’वर...
साहेब, टरबूज विक्रीला परवानगी द्या अकोला ः दरवर्षी रमजान महिन्यात टरबुजाला चांगली...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
कांदाकोंडी टाळणेच योग्य पुणेः कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यात...
मंत्री साहेब, कोटींच नुकसान होईल हो ! नाशिक: जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी...
साखर निर्यातीचा यंदा विक्रम? कोल्हापूर: साखर निर्यातीची गती पाहता यंदा...
अन्न प्रक्रियेमध्ये अवरक्त किरणांचा वापरअन्न प्रक्रियेदरम्यान पारंपरिक उष्णतेच्या...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी...
महिनाभरातच गाईच्या दूधदरात ८ रुपये कपात नगर ः कोरोना लॉकडाउनमुळे दुधाची मागणी कमी...
काबुली हरभऱ्याच्या दरात घसरणीची शक्यता...नवी दिल्ली ः देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन...
ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा :...पुणे ः कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप...
पीकविम्यासाठी राज्यात बीड मॉडेल ः ...अमरावती : प्रशासकीय खर्च आणि दहा टक्के नफा अशी...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
एक लाख हेक्टरवर फळबागांचे उद्दिष्ट पुणे ः कोविड १९ च्या साथीची स्थिती राज्यभर असली...
‘महाडीबीटी’त आता बियाण्यांचाही समावेश पुणे : राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलमध्ये आता...
पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार पुणे ः मध्य प्रदेशचा आग्नेय भाग आणि परिसरात ते...