Agriculture news in marathi The price of soybean in Daryapur market committee is seven thousand | Agrowon

दर्यापूर बाजार समितीत सोयाबीनला सात हजाराचा भाव

टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 एप्रिल 2021

सोयाबीन दरातील तेजीची घौडादौड कायम असून शुक्रवारी (ता. नऊ)  दर्यापूर बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतीच्या वीस क्विंटल सोयाबीनला विक्रमी सात हजार रुपये भाव मिळाला.

अमरावती : सोयाबीन दरातील तेजीची घौडादौड कायम असून शुक्रवारी (ता. नऊ)  दर्यापूर बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतीच्या वीस क्विंटल सोयाबीनला विक्रमी सात हजार रुपये भाव मिळाला.  बाजार समितीमध्ये हलक्या प्रतीच्या सोयाबीनचे व्यवहार पाच हजार रुपयांनी झाले, अशी माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली. 

या वर्षी बाजारात सोयाबीन बियाणे यांचा तुटवडा उद्भवण्याची  शक्यता आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीचे सोयाबीन खरेदी करून त्याचा बियाण्यांकरिता उपयोग करण्याचे नियोजन अनेकांनी केले आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीचे सोयाबीन बाजारात येताच त्याला दरही चांगला मिळत आहे. परिणामी विदर्भातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर पाच हजार ते सहा हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत पोचले आहेत.

अकोला, वाशीम, अमरावती या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला उच्चांकी सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. अकोला, वाशिम या बाजार समिती सोयाबीन खरेदी विक्री करता मुख्य बाजारपेठा ओळखल्या जातात. अमरावती,  नागपूर बाजार समित्यांमध्ये देखील सोयाबीनची मोठी आवक होते. या सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर सहा हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. परिणामी शेतकरी सुखावले आहेत.

सोयाबीनचा तुटवडा पाहता बियाणेकामी लागणारे सोयाबीन उपलब्ध होण्यात या वर्षी मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे बियाण्यांकरिता लागणाऱ्या सोयाबीनला वाढती मागणी असून, दरही चांगला मिळत आहे. दर्यापूर बाजार समितीत सोयाबीनला यावर्षीचा सर्वात उच्चांकी सात हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला. मात्र अवघ्या वीस क्विंटल सोयाबीनसाठी हा दर होता, अशी माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली. बाजारात शुक्रवारी शंभर क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. उर्वरित सोयाबीनचे व्यवहार पाच हजार ते सहा हजार रुपये क्विंटल या दरम्यान झाले.

प्रतिक्रिया
बाजार समितीमध्ये शुक्रवारी शंभर  क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्यातील अवघ्या वीस क्विंटल चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला सात हजार रुपये इतका विक्रमी दर मिळाला आहे. उर्वरित सोयाबीनचे व्यवहार पाच हजार रुपये ते सहा हजार रुपये क्विंटलने झाले. सोयाबीनची प्रत पाहून दर व्यापाऱ्यांकडून दिला जात आहे. 
- हिम्मत मातकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, दर्यापूर
 


इतर ताज्या घडामोडी
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...