Agriculture news in Marathi The price of sugarcane has gone up | Agrowon

शेवग्याला दराची झळाळी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 डिसेंबर 2021

राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये शेवग्याची मोठी टंचाई दिसून येत आहे. अनेक बाजारपेठांमध्ये शेवग्याच्या आवकेत मोठी घट झाली असून आवकही अनियमित होत आहे.

कोल्हापूर : राज्यात नुकत्याच झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेवग्याचे अतोनात नुकसान झाले आहे. फुलोऱ्याच्या वेळेसच पावसाने दणका दिल्याने फूलगळ झाली आहे. याचा फटका नव्याने येणाऱ्या शेवगा पिकाला बसला. यामुळे राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये शेवग्याची मोठी टंचाई दिसून येत आहे. अनेक बाजारपेठांमध्ये शेवग्याच्या आवकेत मोठी घट झाली असून आवकही अनियमित होत आहे

मागणीइतका पुरवठा होत नसल्याने पंधरा दिवसांपासून शेवग्याच्या दरात विक्रमी वाढ झाली. गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच शेवग्याचे दर किलोस २०० ते ३०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. नवीन पीक येईपर्यंत वाढलेले दर कायम राहतील, असा अंदाज सूत्रांचा आहे

तज्ज्ञ व शेतकरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार थंडीमध्ये शेवग्याचे दर हे वाढलेलेच असतात. साधारणपणे शेवग्याचे दर हे ५० ते ८० रुपये दहा किलो सरासरी इतके असतात. थंडीचे प्रमाण वाढल्यास पीक कमी येत असल्याने फार फार तर १०० ते १५० रुपये इतका भाव काही काळ असतो. जानेवारीनंतर शेवगा सुरू झाल्यानंतर पुन्हा सरासरी इतके दर येतात. 

उष्ण व दमट हवामान शेवगा पिकाच्या वाढीस गरजेचे असते. कोरडे हवामान पिकाच्या फलधारणेसाठी अत्यंत लाभदायक व फायदेशीर ठरते. सरासरी तापमान २५-३० अंश सेल्सिअस फलधारणेच्या अवस्थेत महत्त्वाचे आहे. कडाक्याची थंडी या पिकाला मानवत नाही. गेल्या महिन्याभराचा कालावधी पाहिल्यास दररोज हवामान बदलत आहे. कधी  थंडी, तर कधी पाऊस यामुळे शेवग्याच्या फुलोऱ्याला हानी पोहोचत आहे. याचा विपरीत परिणाम शेवग्याच्या उत्पन्नावर झाला आहे.
- प्रा. संग्राम धुमाळ, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर

या वर्षी वातावरण बदलाचा परिणाम हा शेवग्याच्या पिकांवर जास्त झाला. ढगाळ वातावरणामुळे पानगळ, फूलगळ अधिक झाली. फूलगळ झाली, की फुलाचे सेटिंग करणे अवघड होते. अनिश्‍चित हवामानामुळे शेवग्याचे उत्पादन कमी येत आहे. सध्या किलोस दोनशे रुपयांहून अधिक दर आहे. गेल्या दहा वर्षांपासून शेवगा शेंगेचे उत्पादन करतो, परंतु इतका दर पहिल्यांदाच मिळत आहे. 
- आदिनाथ किणीकर, कोगील बुद्रुक, ता. करवीर, जि. कोल्हापूर

यंदा प्रतिकूल हवामानामुळे मला शेवगा शेंग घेता आली नाही. राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये शेवगा शेंग यंदा पहिल्यांदाच किलोस तीनशे रुपयांपर्यंत विकली जात आहे. शेवगा उत्पादनात सातत्य असते. दीडशे रुपयांपर्यंत दर आम्ही घेतला आहे. यंदा दुपटीने दर झाला आहे. मात्र, या दराचा लाभ आम्हास या वर्षी झाला नाही. याची खंत आहे.
- सागर खराडे, देवळाली, ता. भूम, जि. उस्मानाबाद
 


इतर बातम्या
बासमतीची निर्यात वाढण्याची शक्यता इराण आणि सौदी अरेबियाकडून होणारी बासमती तांदळाची...
राज्यात थंडीची लाट पसरणार :...पुणे : पाकिस्तान मार्गे देशाच्या पश्चिम...
गरीब कुटुंबांच्या उत्पन्नात ५३...आर्थिक उदारीकरणानंतर (Economic liberalization)...
आंबा, काजू हंगाम उशिरा सुरू होण्याचा...  वृत्तसेवा - गेल्या आठवड्याच्या शेवटी...
अन् शेतकऱ्याच्या हातात उरतं फक्त पाचटउसाला तुरा लागणं याला शेतकरी उसाचं वय झालं असं...
केंद्र सरकारकडून ६०६.१९ लाख टन...केंद्र सरकारने २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात एकूण...
खाद्यतेलातील तेजीचा  सोयाबीनला लाभ...पुणेः देशात पामतेलाची उपलब्धता कमी असल्याने...
तापमानात घट; द्राक्ष मण्यांना तडे नाशिक : रविवारी (ता.२३) रोजी सकाळपासूनच धुके आणि...
उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा...पुणे : आखाती देशातून आलेल्या धूळ वादळामुळे...
जास्त उत्पादकतेच्या कापूस  बियाण्याला...पुणेः पाकिस्तानमध्ये कापसाची उत्पादकता दिवसेंदिवस...
गुहागरमध्ये दीडशे एकरातील  आंबा, काजू...गुहागर, जि. रत्नागिरी : तालुक्यातील गिमवी देवघर...
गावरान लाल मिरचीचा यंदा ठसकानांदेड : नायगाव तालुक्यातील बरबडा येथील गावरान...
उन्हाळ्यात पाणी टंचाई कमी भासणार पुणे : पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्याने भूगर्भातील...
वाशीममध्ये दर शनिवारी  होणार हळद खरेदी...वाशीम ः हळदीचे उत्पादन घेण्यात विदर्भात आघाडीवर...
जालन्यात गहु सोंगणीला सुरुवातपिंपळगाव रेणुकाई, जि. जालना : पिंपळगाव रेणुकाईसह...
रिक्तपदांमुळे नांदेड कृषी विभाग सलाइनवरनांदेड : साडेपाच लाख खातेदार शेतकऱ्यांचा कारभार...
वीजपुरवठा खंडित केल्याशिवाय पर्याय नाही...मुंबई : राज्यातील कृषी वीज पंप ग्राहकांकडे ४१...
बुलडाणा जिल्ह्यात तेरा बाजार...खामगाव, जि. बुलडाणा ः जिल्ह्यातील तेरा कृषी...
पुणे जिल्ह्यात ७७ लाख टन उसाचे गाळपपुणे ः साखर कारखान्यांचा गाळप हंगाम मध्यावर आला...
तोडणीला उशीर होत असल्याने उसाला तुरेनगर : गत दोन वर्षात मोठ्या प्रमाणात झालेल्या...