agriculture news in marathi The price of sugarcane in the town is Rs. 2000 to 4500 | Page 3 ||| Agrowon

नगरमध्ये शेवग्याला २००० ते ४५०० रुपये दर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 जुलै 2021

नाशिक : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत दर दिवसाला शेवग्याची आवक होत आहे. प्रतिक्विंटलला २ ते ४ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला.

नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत दर दिवसाला शेवग्याची आवक होत आहे. प्रतिक्विंटलला २ ते ४ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला. कोबी, टोमॅटो, बटाटे, काकडीची आवकही वाढली होती. भुसारची आठवडाभर बऱ्यापैकी आवक होत आहे, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोची दर दिवसाला २४५ ते २५० क्विंटलची आवक झाली. दर ५०० ते १ हजार राहिला. वांग्यांची ३८ ते ४० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार, फ्लॉवरची ८५ ते ९० क्विंटलची आवक होऊन ५०० ते १ हजार ५००, कोबीची ९० ते ९५ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १ हजार २००, काकडीची ९३ ते १०० क्विटंलची आवक होऊन ५०० ते १ हजार, गवारीची ९ ते १२ क्विटंलची आवक होऊन २ हजार ते ५ हजार, दोडक्याची २० ते २५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ३ हजार रुपये दर मिळाला.

भेंडीची २५ ते ३० क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते २ हजार, वाल शेंगांची ६ ते ८ क्विंटलची आवक होऊन २ ते ६ हजाराचा दर मिळाला. घेवड्याचा ३ ते ४ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ४ हजाराचा दर मिळाला. बटाट्याची २६० ते २७० क्विंटलची आवक होऊन ८०० ते ९०० रुपये प्रतीक्विंटलचा दर मिळाला. लसणाची ४७ ते ५५ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ९ हजार, हिरव्या मिरचीची ५२ ते ५७ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजाराचा दर मिळाला.

शेवग्याची ९ ते १५ क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते  ४ हजार ५०० रुपयाचा दर मिळाला. आल्याची २० ते २५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते२ हजार ८०० रुपयांचा दर मिळाला. कोथिंबीर, मेथी, पालक, चुका, करडी भाजी, मुळा, आदींसह पालेभाज्यालाही चांगली मागणी राहिली.  

भुसारची आवक बऱ्यापैकी 

नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भुसारची बऱ्यापैकी आवक होत आहे. गावरान ज्वारीची दर दिवसाला साधारण १५० ते २०० क्विंटलची आवक होत आहे. १८०० ते २२०० रुपयापर्यंत दर मिळाला.

बाजरीची ३० ते ४० क्विंटलची आवक होऊन १३७५ ते १४५० रुपये व गव्हाची ३७५ ते ४०० क्विटंलची आवक होऊन  १६७१ ते १९१९ रुपयांपर्यंत दर मिळाला. तुरीची ५५ ते ६० आवक होऊन ५ हजार ते ६ हजार रुपयांचा दर मिळाला. मुगाची १२५ ते १३० क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ६ हजाराचा दर  मिळाला.


इतर ताज्या घडामोडी
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...
पीकविमा योजना शासनाने चालवावी : भारत...अकोला : हजारो कोटी रुपये कमाई करणाऱ्या...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
कृषी कायद्यांबाबतचा अहवाल खुला करावा :...अकोला : केंद्र सरकारच्या कृषिविषयक कायद्यांना...
सागर खोतकडून ‘स्वाभिमानी’च्या...नेर्ले, जि. सांगली : आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
खडसे, महाजन यांना सहकारात एकत्र...जळगाव : राज्याच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथ...
फुंडकर फळबाग योजनेत शेतकऱ्यांचे ७५ लाख...नांदेड : रोजगार हमी योजनेत पात्र ठरु शकत नाहीत...
नाशिक बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी...नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ ऑक्टोबर...
जमनालाल बजाज पुरस्कार बी. बी. ठोंबरे...लातूर : कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिसकडून...
अज्ञाताने फवारले कांद्यावर तणनाशक; ...भुसावळ, जि. जळगाव : तळवेल (ता. भुसावळ) येथील...
पंजशीरवर तालिबानचा ताबा; गर्व्हनर...काबूल : अफगाणिस्तानातील सर्वात कठिण मानला...
शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या संपूर्ण...अकोला : शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या पायातील सर्व...
काथ्या उद्योगवृद्धीसाठी सर्वतोपरी...सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात काथ्या उद्योग...
चांदूर बाजार तालुक्यात ४२ टक्‍क्‍यांनी...अमरावती : शेती कामाकरिता बैलांचा वापर होत...
शेतकऱ्यांची लूट थांबली पाहिजे : शरद पवारजुन्नर, जि. पुणे ः शेतीमालाला चांगला भाव देण्याची...
पाच मंगळवार शेती कामांना ब्रेक;...आर्णी, जि. यवतमाळ : ८५ वर्षांपूर्वी आलेल्या...
संत्रा उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर...अमरावती : विदर्भातील मुख्य पीक असलेल्या संत्रा...
नागपूर जिल्हा परिषदेत ‘फाइल ट्रॅकर’नागपूर : ‘सरकारी काम आणि महिनाभर थांब’, असाच...
आंबा, काजू विम्यासाठी जुने निकष लागू...सिंधुदुर्गनगरी ः फळपीक विमा योजनेचे बदललेले निकष...