तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवर

स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी वाढल्याने त्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने तुरीच्या दरात तेजी नोंदविण्यात आली आहे तुरीचे हब अशी ओळख असलेल्या अकोला, अमरावती, नागपूर बाजार समितीत तुरीचे दर ६८०० पर्यंत पोहोचले आहेत.
The price of trumpet is six thousand per quintal
The price of trumpet is six thousand per quintal

नागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी वाढल्याने त्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने तुरीच्या दरात तेजी नोंदविण्यात आली आहे तुरीचे हब अशी ओळख असलेल्या अकोला, अमरावती, नागपूर बाजार समितीत तुरीचे दर ६८०० पर्यंत पोहोचले आहेत.

या वर्षी (२०१९-२०) हंगामात शासनाकडून तुरीला पाच हजार आठशे रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला होता. बाजारात यापेक्षा कमी दर असल्याने शेतकऱ्यांनी आपल्याकडील तूर शासनाला हमीभावाने दिली. नाफेडने ही तूर बफर स्टॉक म्हणून आपल्याकडे साठवली असून त्यातील काही तुरीची विक्री निविदेच्या माध्यमातून केली जात आहे. परंतु हे प्रमाण कमी असल्याने आणि नव्या हंगामातील तूर येण्यास बराच वेळ असल्याने बाजारात तुरीचे दर वधारले आहेत.

अकोला बाजार समितीत दररोज तुरीची आवक २०० ते ७० क्विंटल इतकी अत्यल्प आहे. अमरावती बाजार समिती देखील अशी स्थिती असून नागपूर बाजार समितीत तर अवघ्या ३९ क्विंटल तुरीची आवक नोंदविण्यात आली. परिणामी विदर्भासह राज्यात तुरीचे दर सहा हजार ते सहा हजार आठशेवर पोहोचले आहेत. स्थानिक प्रक्रिया उद्योजकांची वाढती मागणी असल्याने हे दर तेजीत आल्याचे सांगितले जाते. यापुढील काळात वीस ते तीस रुपये इतकेच क्विंटलमागे वाढतील यापेक्षा वाढीची अपेक्षा नसल्याचे बाजार विश्लेषकांनी सांगितले.

नाफेडचे बफर स्टॉकवर लक्ष केंद्रित हमीभावाने सर्वच्या सर्व तूर नाफेड करून खरेदी करण्यात आली. त्यामुळे बाजारात तुरीची आवकच नसल्याने दरात तेजी अनुभवली जात आहे. नाफेड कडून २०१८-१९ या वर्षातील तूर निविदेच्या माध्यमातून विकल्या जात आहे. ६८ ते ७२ रुपये किलोचा दर आहे. प्रक्रिया करून ती १०० रुपयांना पडते. परंतु नाफेडने बफर स्टॉकवर लक्ष केंद्रित केल्याने ही विक्रीदेखील अत्यल्प आहे. नगर भागातील तूर १५ नोव्हेंबरनंतर बाजारात येते त्यासोबतच चार लाख टन तुरीच्या आयातीचा विचार केंद्र सरकारचा आहे. या घडामोडीनंतर दर काही अंशी खाली येण्याची शक्यता आहे, असे बाजार विश्‍लेषक ओमप्रकाश गोयनका यांनी सांगितले.

तूर स्थिती (नागपूर बाजार समिती) २२ सप्टेंबर २०१९ - ५५०० ते ५१०० रुपये २२ सप्टेंबर २०२० - ६००० ते ६८०० रुपये

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com