Agriculture news in Marathi The price of trumpet is six thousand per quintal | Agrowon

तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी वाढल्याने त्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने तुरीच्या दरात तेजी नोंदविण्यात आली आहे तुरीचे हब अशी ओळख असलेल्या अकोला, अमरावती, नागपूर बाजार समितीत तुरीचे दर ६८०० पर्यंत पोहोचले आहेत.

नागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी वाढल्याने त्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने तुरीच्या दरात तेजी नोंदविण्यात आली आहे तुरीचे हब अशी ओळख असलेल्या अकोला, अमरावती, नागपूर बाजार समितीत तुरीचे दर ६८०० पर्यंत पोहोचले आहेत.

या वर्षी (२०१९-२०) हंगामात शासनाकडून तुरीला पाच हजार आठशे रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला होता. बाजारात यापेक्षा कमी दर असल्याने शेतकऱ्यांनी आपल्याकडील तूर शासनाला हमीभावाने दिली. नाफेडने ही तूर बफर स्टॉक म्हणून आपल्याकडे साठवली असून त्यातील काही तुरीची विक्री निविदेच्या माध्यमातून केली जात आहे. परंतु हे प्रमाण कमी असल्याने आणि नव्या हंगामातील तूर येण्यास बराच वेळ असल्याने बाजारात तुरीचे दर वधारले आहेत.

अकोला बाजार समितीत दररोज तुरीची आवक २०० ते ७० क्विंटल इतकी अत्यल्प आहे. अमरावती बाजार समिती देखील अशी स्थिती असून नागपूर बाजार समितीत तर अवघ्या ३९ क्विंटल तुरीची आवक नोंदविण्यात आली. परिणामी विदर्भासह राज्यात तुरीचे दर सहा हजार ते सहा हजार आठशेवर पोहोचले आहेत. स्थानिक प्रक्रिया उद्योजकांची वाढती मागणी असल्याने हे दर तेजीत आल्याचे सांगितले जाते. यापुढील काळात वीस ते तीस रुपये इतकेच क्विंटलमागे वाढतील यापेक्षा वाढीची अपेक्षा नसल्याचे बाजार विश्लेषकांनी सांगितले.

नाफेडचे बफर स्टॉकवर लक्ष केंद्रित
हमीभावाने सर्वच्या सर्व तूर नाफेड करून खरेदी करण्यात आली. त्यामुळे बाजारात तुरीची आवकच नसल्याने दरात तेजी अनुभवली जात आहे. नाफेड कडून २०१८-१९ या वर्षातील तूर निविदेच्या माध्यमातून विकल्या जात आहे. ६८ ते ७२ रुपये किलोचा दर आहे. प्रक्रिया करून ती १०० रुपयांना पडते. परंतु नाफेडने बफर स्टॉकवर लक्ष केंद्रित केल्याने ही विक्रीदेखील अत्यल्प आहे. नगर भागातील तूर १५ नोव्हेंबरनंतर बाजारात येते त्यासोबतच चार लाख टन तुरीच्या आयातीचा विचार केंद्र सरकारचा आहे. या घडामोडीनंतर दर काही अंशी खाली येण्याची शक्यता आहे, असे बाजार विश्‍लेषक ओमप्रकाश गोयनका यांनी सांगितले.

तूर स्थिती (नागपूर बाजार समिती)
२२ सप्टेंबर २०१९ - ५५०० ते ५१०० रुपये
२२ सप्टेंबर २०२० - ६००० ते ६८०० रुपये


इतर बाजारभाव बातम्या
सांगलीत गूळ सरासरी ३६३३ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २७)...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
नाशिकमध्ये वालपापडी, घेवड्याची आवक वाढलीनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये गवार, वांग्याच्या दरात तेजीनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सोलापुरात घेवडा, वांग्याचे दर पुन्हा...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी १३५० रूपये प्रतिक्विंटलपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
राज्यात केळी ४०० ते ११०० रुपये क्विंटलनाशिकमध्ये ४०० ते १००० रूपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये दोडका सरासरी ४१६५ रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये भाजीपाल्याच्या दरात सुधारणा नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात भाजीपाल्याच्या दरात वाढकोल्हापूर :  येथील बाजार समितीत या सप्ताहात...
सोलापुरात गवार, घेवडा, भेंडीतील तेजी...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक सर्वसाधारण; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात सोयाबीन दरातील तेजीबाबत...नागपूर : संततधार पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनची...
पुणे बाजारात कांदा दरात सुधारणापुणे ः राज्यात सर्वदूर झालेल्या पावसाचा फटका...
नवरात्रोत्सवामुळे फूल बाजाराला `रंग`पुणे: कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
परभणीत आवळ्यांना सरासरी ११०० रुपये दरपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात वांगी सरासरी १५०० ते ८००० रूपयेनाशिकमध्ये ३००० ते ५५०० रुपये नाशिक : येथील...